Ahilyanagar Attack :
अहिल्यानगर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जामखेड तालुक्यातील मोहा येथील रेणुका कला केंद्रावर मध्यरात्री अज्ञात १७ ते २० जणांच्या टोळक्यांनी हल्ला केला. (Ahilyanagar Attack) या हल्ल्यात त्यांनी तलवारी, काठ्या, कोयते आणि लोखंडी रॉड घेऊन गाड्यांच्या काचा, किराणा दुकानाचे काऊंटर आणि कलाकेंद्रातील साहित्याची तोडफोड केली.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार स्पष्टपणे कैद झाला आहे. पोलिसांनी ज्योती पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात १७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेमागे तीन दिवसांपूर्वी झालेल्या छेडछाड आणि मारहाणीच्या प्रकरणातील राग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हल्लेखोरांनी ‘चिंग्याच्या नादी लागू नका, नाहीतर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील’ असे म्हणत परिसरात दहशत माजवली. त्यांनी गाड्यांच्या काचा, होम थिएटर आणि खुर्च्यांची तोडफोड केली. हल्ल्याच्या वेळी कलाकेंद्रात उपस्थित महिला आणि लहान मुले घाबरून लपून बसली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच हल्लेखोर रिक्षा आणि दुचाकीवरून बीडच्या दिशेने पळून गेले.
जामखेड पोलिसांनी आता या घटनेचा तपास सुरू केला असून पोलीस नाईक रवींद्र वाघ पुढील चौकशी करत आहेत. दरम्यान, जामखेडमधील रहिवाशांमध्ये या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Ahilyanagar Attack
https://mhdu.in/nashik-8-year-old-girl-accident/Tragic Accident on Pipeline Road Nashik – 8-Year-Old Girl Navika Nerkar Dies in Heavy Vehicle Collision | पाइपलाइन रोडवर भीषण अपघात, आठ वर्षांच्या नविका नेरकरचा जागीच मृत्यू
Source : Local Confirmation Reporter-Vishal Bhadane
mhdunews #mhdusocial #AhilyanagarAttack #JamkhedNews #MaharashtraCrime #CCTVFootage #BreakingNews

