Agri College Dhule Rural Awareness Programmeकृषी महाविद्यालय धुळेच्या विद्यार्थिनी शेतात प्रत्यक्ष काम करत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन करत आहेत.

Agri College Dhule Rural Awareness Programme

धुळे | कृषी महाविद्यालय, धुळे येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी एक अनोखा आणि उपयुक्त उपक्रम हाती घेतला असून, त्यांनी आपल्या कृषी अभ्यासाचा प्रत्यक्ष प्रयोग शेतकऱ्यांच्या शेतात काम करून ग्रामीण भागात शेतीविषयक जागरूकतेचा संदेश देण्याचे काम सुरू केले आहे. (Agri College Dhule Rural Awareness Programme)

ग्रामीण भागातील अनेक शेतकरी नवनवीन कृषी अद्यतने आणि आधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित राहतात. शेतीचा अनुभव असला तरी, त्यामध्ये आवश्यक बदल केल्यास उत्पादन व उत्पन्नात कसा फरक पडू शकतो, याची माहिती अनेकांना नसते. ही बाब लक्षात घेऊन कृषीकन्यांनी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. (Agri College Dhule Rural Awareness Programme)

ग्रामीण जागरूकता आणि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत धुळे शहरालगत असलेल्या सरवड गावात कृषीकन्या तब्बल ७५ दिवस वास्तव्यास राहणार असून, या कालावधीत शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये शासन तसेच कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले नवीन वाण, आधुनिक शेती पद्धती, सेंद्रिय शेती, शेती करताना नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, माती परीक्षण तसेच पिकांची योग्य निवड आदी बाबींचा समावेश आहे.

या उपक्रमांतर्गत तेजस्वी जाधव, शर्वरी गायकवाड, तेजस्विनी शिरसाठ, भक्ती शेटे, पायल शेंडे, अदिती तुपलोंढे आणि प्रणाली तरंगे या कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. (Agri College Dhule Rural Awareness Programme)

या कार्यक्रमासाठी सरपंच सौ. रेवती ठाकरे, उपसरपंच श्री. विनोद बोरसे, पोलीस पाटील श्री. बाबुराव ठाकरे, सचिन बोरसे, सुधाम पाटील, सदाशिव पाटील, मुकुंद पाटील, प्रभुल बोरसे, महेंद्र बोरसे, शेखर पाटील, मैत्रा पाटील, प्रकाश पाटील, युवराज बोरसे, शालिग्राम बोरसे, अशोक बोरसे, अरुण बोरसे, नंदलाल बोरसे यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या संपूर्ण उपक्रमासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी. एम. इल्हे तसेच ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाचे चेअरमन डॉ. जयप्रकाश गायकवाड सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

MHDU News : Vishal Bhadane Agri College Dhule Rural Awareness Programme

Agri College Dhule Rural Awareness Programme
कृषी महाविद्यालय धुळेच्या विद्यार्थिनी शेतात प्रत्यक्ष काम करत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन करत आहेत.

तपोवन वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) ची स्थगिती; नाशिककरांना मोठा दिलासा

Agri College Dhule Rural Awareness Programme

Dhule | Final-year students of the Agriculture College, Dhule have undertaken a unique and meaningful initiative by applying their academic knowledge directly in farmers’ fields and spreading awareness about modern agricultural practices in rural areas. (Agri College Dhule Rural Awareness Programme)

Many farmers in rural regions remain unaware of the latest agricultural updates and advanced technologies. While they possess traditional farming experience, they often lack information about how adopting new methods can improve productivity and income. Recognizing this issue, the agri students decided to implement this awareness initiative. (Agri College Dhule Rural Awareness Programme)

Under the Rural Awareness and Work Experience Programme, the students will stay in Sarwad village, located near Dhule city, for a period of 75 days. During this time, farmers will be guided on topics such as newly developed crop varieties by government and agricultural universities, modern farming techniques, organic farming, adoption of new technologies, soil testing, and proper crop selection.

As part of this initiative, Tejaswi Jadhav, Sharvari Gaikwad, Tejaswini Shirsath, Bhakti Shete, Payal Shende, Aditi Tuplondhe, and Pranali Tarange actively guided and interacted with the farmers.

The programme witnessed the presence of Sarpanch Mrs. Revati Thakre, Deputy Sarpanch Mr. Vinod Borse, Police Patil Mr. Baburao Thakre, Sachin Borse, Sudham Patil, Sadashiv Patil, Mukund Patil, Prabhul Borse, Mahendra Borse, Shekhar Patil, Maitra Patil, Prakash Patil, Yuvraj Borse, Shaligram Borse, Ashok Borse, Arun Borse, Nandlal Borse, along with a large number of village women.

The initiative was successfully conducted under the guidance of Associate Dean Dr. B. M. Ilhe and Dr. Jayprakash Gaikwad, Chairman of the Rural Agricultural Awareness and Agro-Industrial Work Experience Programme.

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

2 thoughts on “Agri College Dhule Rural Awareness Programme : कृषी महाविद्यालय धुळेच्या विद्यार्थिनींनी हाती घेतला 75 दिवसांचा अनोखा उपक्रम”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *