Nashik Crime Social Media Rapers Arrest
नाशिक – सोशल मीडियावर रील्स बनवून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर उपनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जेलरोंड परिसरातील कॅनल सेड आम्रपाली झोपडपट्टी भागात राहणाऱ्या पाच तरुणांना पोलिसांनी सोमवारी अटक केली.
या तरुणांनी सोशल मीडियावर “नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला” अशा धमकीच्या वाक्यांसह रील्स पोस्ट करत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारावर पोलिसांनी तात्काळ लक्ष देत कारवाई केली आणि सर्वांना ताब्यात घेतले.
आरोपींच्या मोबाइलमधील व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग तपासले जात असून, पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया अकाउंट्सवर कारवाई करण्यासाठी प्लॅटफॉर्मकडे पत्र पाठवले आहे.
पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, “नाशिक शहरात कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, स्थानिक रहिवाशांनी पोलिसांच्या त्वरित कारवाईचे स्वागत केले आहे.
MHDU News : Vishal Bhdane Nashik Crime Social Media Rapers Arrest
#Nashik #Crime, Police Action, Jailroad, Amrapali Slum, Social Media, Reel, Arrest, MHDU News


[…] नाशिक – सोशल मीडियावर रील्स बनवून परि… […]