Vasant Gite criticizes BJP over alleged parallel police commissionerate in Nashikमाजी आमदार वसंत गीते यांचा भाजपवर हल्लाबोल – “समांतर पोलीस आयुक्तालय चालवू नका!”

Vasant Gite Nashik :

नाशिक शहरातील बेकायदेशीर कामे आणि वाढत्या गुन्हेगारीविरोधात नाशिक पोलिसांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेचं सर्वत्र स्वागत होत आहे. या मोहिमेचं कौतुक करताना शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे माजी आमदार वसंत गीते यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे.

भाजपकडून या परिस्थितीचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, गीते म्हणाले — “शहराचं नुकसान करून ठेवणाऱ्या भाजपकडून आता पोलिसांच्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न होतोय. हे निंदनीय आहे.”

भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्यावरही गीते यांनी टीका केली. केदार म्हणाले होते की, “भाजप पदाधिकारी किंवा माजी नगरसेवक आपल्या ओळखीचा गैरवापर करत असतील तर त्यांची नावे कळवा, आम्ही ती पोलिसांना देऊ.” या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गीते म्हणाले,

Vasant Gite Nashik

“भाजपने आधी स्वतःच्या पक्षात कोणकोण गुन्हेगार आहेत याची यादी तयार करावी आणि तीच यादी थेट पोलीस आयुक्तांना द्यावी. त्यामुळे शहरातील गुन्हेगार ओळखणे पोलिसांना सोपे जाईल.”

गीते यांनी पुढे सांगितले की, नाशिक पोलिसांवर नागरिकांचा पूर्ण विश्वास आहे आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी ते सक्षम आहेत. त्यामुळे भाजपने कोणत्याही राजकीय दबावाने किंवा ‘समांतर पोलीस यंत्रणा’ निर्माण करून हस्तक्षेप करू नये.

ते म्हणाले —

“भाजपने पर्यायी पोलीस यंत्रणा किंवा समांतर पोलीस आयुक्तालय सुरू करू नये. नागरिकांनी थेट पोलिसांकडे तक्रारी नोंदवाव्यात, त्यासाठी कोणताही मध्यस्थ नको.”

नाशिक पोलिसांच्या धडक मोहिमेला शहरवासीयांचा पाठिंबा मिळत असताना, गीते यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

Vasant Gite Nashik

Former Corporator Mukesh Shahane Questioned by Crime Branch – माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांची गुन्हे शाखेकडून चौकशी

mhdunews #mhdusocial #VasantGite #BJP #NashikNews #NashikPolitics #NashikPolice #SandeepKarnik #ShivSenaUBT #MaharashtraNews #PoliticalNews #BreakingNews #NashikCrime #MHDUUpdates #ViralNews #NashikLive

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Vasant Gite Nashik Slams BJP : – वसंत गीते यांचा भाजपवर गंभीर आरोप; ‘समांतर पोलीस आयुक्तालय चालवू नका!0”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed