Secret bunker found in RPI leader Prakash Londe’s Nashik officeपोलिसांनी प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयावर झडती घेताना भुयारघर सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Prakash Londhe Secret Bunker Found

नाशिक : शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत राजकीय आशीर्वाद असलेल्या गुन्हेगारांवर धडक कारवाई सुरू असून, त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या अनधिकृत संपर्क कार्यालयावर शनिवारी पोलिसांनी झडती घेतली असता, जमिनीखाली चक्क भुयारघर (Secret Bunker) असल्याचे उघड झाले आहे. पोलिस तपासात आलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. (Prakash Londe secret bunker)

सदर भुयारघराचा (Prakash Londhe Secret Bunker Found) वापर नेमका कोणत्या हेतूसाठी होत होता, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, या ठिकाणाचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

२०१५ साली या ठिकाणावरील अनधिकृत बांधकाम महापालिकेने पाडले होते. तेव्हाही तिथे भुयार सापडल्याची नोंद आहे. त्यानंतर पुन्हा या जागेवर लोंढे यांनी नव्याने आणि अधिक भव्य कार्यालय उभारले. सत्ताधारी पक्षाच्या पाठबळामुळे महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

अलीकडेच शहरातील एका बिअर बार मालकावर खंडणीसाठी गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात प्रकाश लोंढे यांचा मुलगा दीपक लोंढे अटकेत, तर दुसरा मुलगा भूषण लोंढे फरारी आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कार्यालयाची तपासणी केली असता पुन्हा भुयारघराचा उलगडा झाला आहे.

पोलिसांनी हे ठिकाण सील करून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाशी संपर्क साधला आहे. नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Prakash Londhe secret bunker

#mhdunews #prakashlondhe #bunker #crime #nashikpolice

Tragic Accident on Pipeline Road Nashik – 8-Year-Old Girl Navika Nerkar Dies in Heavy Vehicle Collision | पाइपलाइन रोडवर भीषण अपघात, आठ वर्षांच्या नविका नेरकरचा जागीच मृत्यू

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

2 thoughts on “Nashik Crime : RPI Leader Prakash Londhe Secret bunker Found In 0ffice – आरपीआय नेत्याच्या कार्यालयात सापडलं गुप्त भुयारघर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed