Nashik Roads Pothole
नाशिक : शहरातील रस्त्यांची दुर्दशा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. “रस्ते खड्डेमुक्त करू” अशी आश्वासने देणारे मंत्री गिरीश महाजन आणि प्रशासनाची वचने हवेत विरली आहेत, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. आरटीओ कॉर्नर ते बळी मंदिर या अरुंद आणि खड्डेमय रस्त्यांवर गेल्या महिन्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आणि जनआक्रोश आंदोलन केले.
शुक्रवारी नागरिकांनी आरटीओ कॉर्नर चौकात रास्ता रोको करून प्रचंड संताप व्यक्त केला. “अपघातात प्राण गमावणाऱ्या हितेश पाटील आणि जयश्री सोनवणे यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?” Nashik Roads Pothole अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनात सहभागी झालेल्या २७ वर्षीय मुलाला गमावलेल्या वडिलांचे दुःख पाहून महिलांना अश्रू अनावर झाले.
महानगरपालिकेची निष्काळजीपणा? (Nashik Roads Pothole)
नागरिकांनी स्पष्ट मागणी केली की, या अपघातांसाठी मनपा अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडत असून वाहतूक कोंडीसह नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
आश्वासनं फसवी ठरतायत!
काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सिमा हिरे, देवयानी फरांदे आणि राहुल ढिकले यांनी मुख्यमंत्र्यांकडे विशेष निधीची मागणी केली होती. तसेच मंत्री गिरीश महाजन यांनी “पावसाळा संपताच रस्त्यांची तातडीने दुरुस्ती केली जाईल” अशी घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नसल्याचे नागरिकांचे मत आहे.
अरुंद रस्ता आणि वाढलेले अपघात
आरटीओ कॉर्नर ते बळी मंदिर हा मार्ग दिंडोरी एमआयडीसी आणि गुजरातकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा असून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. रस्ता अरुंद, साईड पट्ट्यांची अवस्था बिकट आणि खड्ड्यांमुळे हा मार्ग अपघातांचा ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. इतर प्रमुख रस्ते चारपदरी झाले असले तरी हा मार्ग अजूनही दुर्लक्षित आहे.
नवीन ताज्या घडामोडी 👇: Nashik Roads Pothole -Free Promise in Air? – नाशिककरांचा संताप रस्त्यावर, अपघातात 2 प्राण गमावणाऱ्या हितेश पाटील आणि जयश्री सोनवणे यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?”नागरिकांनी कुंभमेळा निधीतून या मार्गाचे विस्तारीकरण करून खड्डेमुक्त करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनात सुनील निरगुडे, रवी गायकवाड, प्रवीण जाधव, योगेश जाधव, संतोष पेनमहाले, राजू देसले, विशाल कदम यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले.


[…] […]