Nashik Crime : Nashik Police On Action Mode
नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं असतानाच, Nashik Police शहरातील अट्टल गुंडांना गुडघ्यावर आणत जबरदस्त कारवाई केली आहे. तुरुंगातून सुटलेल्या आरोपीचा रील (Reel) सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हालचाल करत शहरात दहशत माजवणाऱ्या टोळीवर कठोर पाऊल उचललं.
ही कारवाई फक्त अटक करण्यापुरती मर्यादित नव्हती, तर पोलिसांनी आरोपींना रस्त्यावरच गुडघे टेकवून शहरभर Nashik Police धिंड काढत गुन्हेगारीविरोधात एक शक्तिशाली संदेश दिला. ही संपूर्ण कारवाई नाशिक रोड परिसरात झाली असून, नागरिकांकडून पोलिसांच्या या धाडसी पावलाचं जोरदार स्वागत करण्यात येत आहे.
गुंडाची धिंड पहा व्हिडिओ मधे 👇
गुन्हेगारीचा रील आणि शहरात माजलेली दहशत
Nashik Crime : मिळालेल्या माहितीनुसार, अंबड पोलिस स्टेशन हद्दीतील महेश सोनवणे उर्फ चिमण्या हा अट्टल गुन्हेगार काही दिवसांपूर्वी खूनाच्या गुन्ह्यातून तुरुंगातून सुटला होता. सुटकेनंतर त्याचे साथीदार प्रतीक सोनवणे, यश गीते, मोनू सोनवणे, उमेश फसाले, प्रमोद सावडकर, श्रावण पगारे, सुमित बगाटे, मुन्ना सालवे आणि रामू नेपाळी यांच्यासह 15-20 जणांनी दोन आणि चार चाकी वाहनांवरून शहरभर फिरत दहशत निर्माण केली.
या टोळीच्या धिंगाण्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आणि नागरिकांमध्ये Nashik Crime भीतीचे वातावरण पसरले. अधिक धक्कादायक म्हणजे महेश सोनवणेच्या सुटकेनंतर त्याचा जल्लोष साजरा करणारा रील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
पोलिसांची धडक कारवाई: गुडघ्यावर आणले गुंड
या व्हायरल व्हिडिओकडे गंभीरतेने पाहत पोलिसांनी सोमवारी (29 सप्टेंबर) संध्याकाळी मोठी कारवाई केली. आरोपींना अटक करून त्याच रस्त्यावर रांगेत उभं करून गुडघे टेकविण्यास भाग पाडलं जिथे त्यांनी नागरिकांना दहशतीत ठेवले होते. इतकंच नाही, तर पोलिसांनी सर्व आरोपींची शहरभर धिंडही काढली.
नाशिक रोड पोलिस स्टेशनपासून बिटको पॉईंटपर्यंत काढण्यात आलेल्या या धिंडीने शहरात मोठी चर्चा रंगली आहे. ज्या रस्त्यावर आरोपींनी दहशत माजवली, त्याच मार्गावरून त्यांना फिरवण्यात आलं, ज्यामुळे नागरिकांमध्ये आत्मविश्वास वाढला आणि गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
स्पष्ट संदेश: गुन्हेगारांना माफी नाही
नाशिक पोलिसांनी या कारवाईतून स्पष्ट संदेश दिला आहे की, गुन्हेगारी आणि दहशत निर्माण करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही. शहरातील नागरिकांची भीती दूर करून कायदा आणि सुव्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करणे, हा या संपूर्ण मोहिमेचा मूळ उद्देश असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
महेश सोनवणे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध नाशिक रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील चौकशी सुरू आहे.
नवीन ताज्या घडामोडी 👇: Nashik Crime : व्हायरल रीलनंतर Nashik Police On Action Mode, गुंडांना रस्त्यावर गुडघ्यावर बसवत धिंड, 2-3 नाही तर तब्बल 15 जणांची धिंड !कोल्हापूरमध्ये पतीने पत्नीच्या डोळ्यात चटणी फेकून कोयत्याने हत्या केली


[…] Nashik News: Viral Reel Turns Tables as Police Parade Gangsters on Knees in Public […]