अवघ्या सहा वर्षांची त्रिशा ठोसर — राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते National Film Festival Award मिळवत इतिहास रचला. हा पुरस्कार attitude आणि आत्मविश्वासाचं प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.अवघ्या 6 वर्षांची त्रिशा ठोसर — राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड स्वीकारताना.

अवघ्या 6 वर्षांची त्रिशा ठोसर — हा नाव आता फक्त एक बालकलाकार म्हणूनच नाही तर National Film Festival Award प्रेरणादायी आत्मविश्वास आणि कामावरील समर्पणाचे प्रतीक बनले आहे.

२३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळ्यात (National Film Festival Award), राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते हा अवॉर्ड त्रिशाला प्रदान करण्यात आला. हा क्षण पाहून संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि या छोट्या मुलीच्या साधेपणाने व आत्मविश्वासाने सर्वांची मने जिंकली.

साडीने सुसज्ज, नाजूक पण निश्चयी असलेली ही छोटी मुलगी मंचावर जशी उभी राहिली, तिला पाहून उपस्थित प्रत्येक व्यक्ति भारावून गेला. एएनआयशी संवाद साधताना तिने प्रामाणिक शब्दांत सांगितले — “मला खूप छान वाटलं.” राष्ट्रपतींना भेटल्याबद्दल विचारलं असता, “त्यांनी मला जवळ घेतलं आणि अभिनंदन केलं” असं तिने हसत उत्तर दिलं.

त्रिशाच्या पालकांनी तिच्या या ऐतिहासिक यशाची भावना सोशल मीडियावर पोस्ट करून व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी इतका मोठा सन्मान मिळाल्याने आमच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. त्रिशाने महाराष्ट्राचं नाव उंचावलं.”

त्रिशा ठोसर हिचा अवॉर्ड स्वीकारणाचा व्हिडिओ बघा 👇

त्रिशानेही आपल्या पोस्टमध्ये लिहिलं —
“माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे, गेल्या ७० वर्षांत हा सन्मान मिळवणारी मी सर्वात लहान बालकलाकार आहे. या यशात माझ्या आई-बाबांचा, कुटुंबाचा, संपूर्ण चित्रपट टीमचा आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचा मोठा वाटा आहे.”

या सर्वातून एक मोठा संदेश मिळतो — Attitude असावा तर National Film Festival Award मिळवण्याचा! वय हे कधीच बंधन नसतं, आत्मविश्वास आणि साधेपणा असेल तर लहान मुलंही मोठी स्वप्नं पूर्ण करू शकतात.

त्रिशावर संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता ती महेश मांजरेकर यांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमात झळकणार आहे आणि तिचं पुढचं पाऊल आणखी भक्कम होणार आहे.

प्रत्येकाला किती shocking वाटत असेल ना , पण हे खर आहे एक चिमुकली National Award घेतेय

🌟 Salute Trisha!
तू फक्त तुझ्या कुटुंबाचं नाही तर महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव उंचावलं आहेस.

अशाच नवनवीन लेटेस्ट अपडेट साठी आमच्या MH Daily Update ला फॉलो करा.

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

One thought on “Trisha Thosar: अवघ्या 6 वर्षांची त्रिशा ठोसर — National Film Festival Award जिंकून मिळवला ऐतिहासिक सन्मान पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते दिला गेला.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *