Maharashtra ZP And Panchayat Samiti Elections 2025 Voter List For 32 ZPs And 336 Panchayat Samitisमहाराष्ट्रातील 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदार यादी व आरक्षण तपशील

ZP And Panchayat Samiti Elections 2025 :

अखेर राज्य निवडणूक आयोगाने 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार याद्यांचे तपशील जाहीर केले आहेत. या निवडणुकांसाठी पारदर्शक आणि अचूक मतदार यादी सुनिश्चित करण्यासाठी आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे.

📌 महत्त्वाच्या तारखा (Important Dates):

अधिसूचित दिनांक: 1 जुलै 2025

प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध: 8 ऑक्टोबर 2025

हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी: 8 ते 14 ऑक्टोबर 2025

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध: 27 ऑक्टोबर 2025

📌 मतदार यादीतील बदल प्रक्रिया:

विधानसभा मतदार यादीप्रमाणेच नाव व पत्ता कायम राहतील.

नवीन नावांची नोंद, नावे वगळणे किंवा पत्त्यातील दुरुस्ती यासाठी नागरिकांना हरकती व सूचना दाखल करता येतील.

नाव गहाळ होणे, लेखनिकांकडून झालेल्या चुका किंवा निर्वाचक गणनेतील त्रुटी दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे.

📌 निवडणूक आयोगाचे आवाहन:
नागरिकांनी आपले नाव आणि पत्ता योग्यरीत्या नोंदला आहे का हे तपासावे आणि आवश्यक बदल वेळेत नोंदवावेत, असे आवाहन आयोगाने केले आहे. ही प्रक्रिया निवडणुकीतील पारदर्शकता आणि लोकशाहीतील सहभाग अधिक मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.


🏛 जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण (Reservation for ZP President Post 2025):

ठाणे – सर्वसाधारण (महिला)

पालघर – अनुसूचित जमाती

रायगड – सर्वसाधारण

रत्नागिरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सिंधुदुर्ग – सर्वसाधारण

नाशिक – सर्वसाधारण

धुळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

नंदुरबार – अनुसूचित जमाती

जळगाव – सर्वसाधारण

अहिल्यानगर – अनुसूचित जमाती (महिला)

पुणे – सर्वसाधारण

सातारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सांगली – सर्वसाधारण (महिला)

सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग

कोल्हापूर – सर्वसाधारण (महिला)

छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण

जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

बीड – अनुसूचित जाती (महिला)

हिंगोली – अनुसूचित जाती

नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

लातूर – सर्वसाधारण (महिला)

अमरावती – सर्वसाधारण (महिला)

अकोला – अनुसूचित जमाती (महिला)

परभणी – अनुसूचित जाती

वाशीम – अनुसूचित जमाती (महिला)

बुलढाणा – सर्वसाधारण

यवतमाळ – सर्वसाधारण

नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग

वर्धा – अनुसूचित जाती

भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग

गोंदिया – सर्वसाधारण (महिला)

चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)

गडचिरोली – सर्वसाधारण (महिला)

https://mhdu.in/ladki-bahin-yojana-ekyc-scam-alert/: ZP And Panchayat Samiti Elections 2025: अखेर राज्य निवडणूक आयोगाने 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समिती

Dofollow

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *