Gadchiroli Ashram School Snakebite Caseजपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणानंतर सरकारची कठोर कारवाई.

Gadchiroli Ashram School Snakebite Case

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने कठोर कारवाई केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित आश्रमशाळेची शासकीय मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी समितीच्या अहवालात आश्रमशाळा प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत गंभीर त्रुटी आढळल्याचे वृत्त आहे.

या घटनेत आश्रमशाळेतील सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाला होता. त्यापैकी तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर एका विद्यार्थिनीला उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले. घटनेनंतर प्रशासनाने चार सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. चौकशी अहवालाच्या आधारे संबंधितांवर कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षक भास्कर भोयर आणि महिला अधीक्षिका भाग्यश्री चिल्लमवार यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे. तसेच संस्थाचालकाविरोधातही फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, या गंभीर घटनेची दखल घेत राज्यातील सर्व आश्रमशाळांची तपासणी करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून सरकारने दिला आहे.

-प्रतिनिधी : कुणाल दानेच Gadchiroli Ashram School Snakebite Case

Nashik Kumbh Mela Fake Work Order Scam : जामनेरच्या दोघांना अटक; 591 कोटींच्या बनावट आदेशांचा पर्दाफाश

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

3 thoughts on “Gadchiroli Ashram School Snakebite Case : जपतलाई आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed