Karale Master Kumbh Mela Controversy FIRकराळे मास्तर यांच्या कुंभमेळ्यावरील वक्तव्यामुळे वाद, वर्धा पोलिसांत गुन्हा दाखल

Karale Master Kumbh Mela Controversy FIR

वर्धा : खदखदफेम नीतेश कराळे उर्फ कराळे मास्तर हे बेधडक आणि परखड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे ते प्रदेश प्रवक्ते असून विविध राजकीय व सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या भाषणांची कायम चर्चा होत असते.

सध्या नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कुंभमेळ्यासाठी होणारा सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा खर्च फालतू असल्याचे कराळे मास्तर यांनी म्हटले. हा खर्च गांजा फुंकणाऱ्या साधूंवर का केला जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, संत चोखामेळा, संत तुकाराम महाराज यांसारख्या प्रबोधन करणाऱ्या संतांची परंपरा आपण मानतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Karale Master Kumbh Mela Controversy FIR)

कुंभमेळ्यात येणारे साधू हे संत नसून गांजा पिणारे असल्याचा दावा करत, जर असे सिद्ध झाले नाही तर १० लाख रुपयांची शर्त लावायला तयार असल्याचे कराळे मास्तर म्हणाले. तसेच सरकारने यावरून राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदेने वर्धा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कराळे मास्तर यांच्यावर अजामीनपत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून केव्हाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कराळे मास्तर म्हणाले की, मी कोणाला घाबरत नाही. मी चुकीचे काही बोललेले नाही. साधू गांजा पितात असे म्हटल्याने धार्मिक भावना कशा दुखावतात, हे मला समजत नाही. जर २५ हजार कोटींपैकी किमान २ हजार कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या शाळांवर खर्च केले, तर ग्रामीण भागातील मोडकळीस आलेल्या शाळांचे चित्र बदलेल आणि गरीब विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी सांगितले. (Karale Master Kumbh Mela Controversy FIR)

याशिवाय कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीवरही कराळे मास्तर यांनी तीव्र आक्षेप घेतला. यापूर्वी नाशिकमध्ये कुंभमेळे झाले असताना झाडे न तोडता आयोजन झाले होते, मग आता एवढी वृक्षतोड कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडे तोडून ती जमीन नंतर उद्योगपतींना देण्याचा कट असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. दीडशे वर्ष जुनी झाडे तोडण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

MHDU News : Vishal Bhadane Karale Master Kumbh Mela Controversy FIR

Karale Master Kumbh Mela Controversy FIR
कराळे मास्तर यांच्या कुंभमेळ्यावरील वक्तव्यामुळे वाद, वर्धा पोलिसांत गुन्हा दाखल

महंत विरुद्ध वृक्षप्रेमी : तपोवन वृक्षतोडीवरून नाशिकमध्ये संघर्ष तीव्र

Karale Master Kumbh Mela Controversy FIR

Wardha: Nitesh Karale, popularly known as Karale Master, is well-known for his bold and outspoken statements. A state spokesperson of the Sharad Pawar faction of the Nationalist Congress Party, Karale frequently attracts attention through his controversial speeches at political and social events.

His recent remarks regarding the Nashik Kumbh Mela have sparked a major controversy. Karale Master questioned the massive expenditure of nearly ₹25,000 crore for the Kumbh Mela, calling it unnecessary. He alleged that such huge spending is being done for sadhus who consume cannabis, questioning what kind of values they represent. He stated that Maharashtra follows reformist saints like Gadge Baba, Tukdoji Maharaj, Sant Chokhamela, and Sant Tukaram Maharaj.

Karale further claimed that the sadhus attending the Kumbh Mela are not saints but cannabis users, and challenged the government by offering a bet of ₹10 lakh to prove his claim. He also demanded the government’s resignation over the issue. (Karale Master Kumbh Mela Controversy FIR)

Following these statements, the Vishwa Hindu Parishad filed a complaint with the Wardha police, alleging that Karale’s remarks hurt religious sentiments. A non-bailable offence has been registered against him, and sources indicate that his arrest could take place at any time.

Reacting to the case, Karale Master said he is not afraid of arrest and stands by his statements. He questioned how stating facts could hurt religious sentiments and reiterated that a portion of the Kumbh Mela budget should instead be spent on improving Zilla Parishad schools, which would benefit poor students in rural areas. (Karale Master Kumbh Mela Controversy FIR)

He also strongly opposed the proposed large-scale tree cutting for the Kumbh Mela. Karale argued that previous Kumbh Melas in Nashik were conducted without cutting trees and alleged a conspiracy to clear land under the pretext of the festival and later hand it over to favored industrialists. He warned that cutting century-old trees would not be tolerated.

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

3 thoughts on “Karale Master Kumbh Mela Controversy FIR : कराळे मास्तर वाद: कुंभमेळ्यावरील वादग्रस्त वक्तव्यामुळे गुन्हा दाखल, केव्हाही अटक होण्याची शक्यता”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *