Suhas Kande vs Sameer Bhujbal Nandgaonनांदगावमध्ये शिवसेना-भाजपची अनपेक्षित युती; भुजबळांच्या योजनांना मोठा धक्का.

Suhas Kande vs Sameer Bhujbal Nandgaon

नाशिक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदगाव-मनमाड-येवला या त्रिकोणात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी शिवसेना (शिंदे गट) सोबत कोणतीही आघाडी न करण्याची स्पष्ट भूमिका आधीच घेतली होती. शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी भाजपसोबत हातमिळवणी करण्याची रणनीती भुजबळ सक्रियपणे आखत होते.

मात्र, या सर्व खेळींना अनपेक्षित ट्विस्ट देत नांदगावचे शिवसेना (शिंदे गट) आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांच्या सर्व गणितांवर विरजण ओतलं आहे. (Suhas Kande vs Sameer Bhujbal Nandgaon)

नांदगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गट) – भाजप युतीची औपचारिक घोषणा आमदार सुहास कांदे आणि भाजप तालुकाध्यक्ष संजय सानप यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. या घडामोडीमुळे राष्ट्रवादी आणि विशेषतः समीर भुजबळांच्या राजकीय हालचालींना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

समीर भुजबळांनी काही दिवसांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन नांदगाव, मनमाड आणि येवला येथे भाजपसोबत युती करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र भाजपने शेवटच्या क्षणी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेऊन संपूर्ण समीकरणच बदलून टाकले. (Suhas Kande vs Sameer Bhujbal Nandgaon)

दरम्यान, कांदे यांनीही पाठीमागून भाजपसोबत सतत संवाद ठेवत शिवसेना कोअर कमिटीमार्फत युतीच्या शक्यता मजबूत केल्या. यामुळे राजकीय पातळीवर अचानक उलटफेर होऊन भुजबळांची संपूर्ण रणनीती कोलमडली, तर सुहास कांदे यांनी मोठी राजकीय बाजी मारली असल्याची चर्चा नांदगावात रंगली आहे.

निवडणुकांच्या उंबरठ्यावर दोन्ही गटातील ही टक्कर आगामी राजकारणाला कोणता कल देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

MHDU News : Vishal Bhadane Suhas Kande vs Sameer Bhujbal Nandgaon

Suhas Kande vs Sameer Bhujbal Nandgaon
नांदगावमध्ये शिवसेना-भाजपची अनपेक्षित युती; भुजबळांच्या योजनांना मोठा धक्का.

इकडे कांदे, तिकडे भुजबळ! नाशिकमध्ये युतीवरून गिरीश महाजन अडचणीत? म्हणाले – “जो आमच्या सोबत, आम्ही त्यांच्या सोबत!”

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

4 thoughts on “Suhas Kande vs Sameer Bhujbal Nandgaon : सुहास कांदे vs समीर भुजबळ: नांदगावच्या राजकारणात मोठा कलाटणीकारक निर्णय”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *