Nashik Kumbh Mela 2027 Meeting Time
नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. कुंभमेळा प्राधिकरणाचे दरवाजे आता सर्वांसाठी खुले करण्यात आले आहेत.
सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह हे दर सोमवार आणि गुरुवार दुपारी १२ ते २ या वेळेत सर्व अभ्यागतांना भेट देणार आहेत. या वेळेत संस्था, अभ्यासक, धार्मिक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांना भेट घेता येईल.
२०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामकाजामुळे आयुक्तांची भेट वेळ ठरविणे गरजेचे झाले होते. नागरिकांच्या सोयीसाठी ही नवी वेळ निश्चित करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी किंवा भेट नियोजनासाठी खालील संपर्क उपलब्ध आहे: (Nashik Kumbh Mela 2027 Meeting Time)
📞 0253-2977375 (सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30)
📧 kumbhmela.2027@maha.gov.in
२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी प्राधिकरणाची यंत्रणा वेगाने काम करत असून, या भेटींच्या माध्यमातून नागरिक आणि संस्था आपले मत, सूचना आणि सहकार्य देऊ शकतील. (Nashik Kumbh Mela 2027 Meeting Time)
MHDU News : Vishal Bhadane Nashik Kumbh Mela 2027 Meeting Time

#kumbhmela #nashik #nashikkumbhmela # nashikkumbhmela2027


[…] […]
i9bet015. Seems like they’re targeting a specific audience. I’ll swing by and observe… is there any reason to actually BET? i9bet015
Who doesn’t love a good bonus? SuperPHRegisterBonus is all about those sign-up deals. Do your research though, always read the terms and conditions. Head over to superphregisterbonus to learn more.