Virat Kohli breaks Kumar Sangakkara’s record in Sydney | सिडनीत विराट कोहलीने संगकाराचा विक्रम मोडलासिडनीत विराट कोहलीचा जुना फॉर्म परतला! सचिननंतर वनडे क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकावर झेप.

Virat Kohli Sidnry Record 2025

दोन डकनंतर अखेर ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर विराट कोहलीच्या बॅटमधून जोरदार फटके पडताना दिसले. सिडनीच्या मैदानावर किंग कोहली पुन्हा आपल्या जुन्या रंगात आला आणि कांगारू गोलंदाजांना चांगलाच तडाखा दिला.

विराटने आपले अर्धशतक केवळ 56 चेंडूत पूर्ण करत सर्व चाहत्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणले. सुरुवातीपासूनच कोहलीच्या फलंदाजीत आत्मविश्वास आणि निर्धार झळकत होता, ज्यासाठी तो ओळखला जातो.

सिडनीत कोहलीने आपली 55वी धाव घेताच एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला. विराट कोहली आता वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत त्याने श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकारा याला मागे टाकले आहे. (Virat Kohli Sidnry Record 2025)

संगकाराच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये एकूण 14,234 धावा आहेत. आता कोहलीने त्या आकड्याला मागे टाकत नवा विक्रम रचला आहे. या यादीत विराटच्या पुढे केवळ सचिन तेंडुलकर उरला आहे. सचिनच्या नावावर 18,426 धावा नोंद आहेत.

संपूर्ण मालिकेत पहिल्यांदाच कोहली आपल्या सर्वोत्तम लयीत दिसला. त्याच्या प्रत्येक फटक्यात तीच जुनी झळाळी आणि आत्मविश्वास जाणवत होता. पहिली धाव घेताच विराटने आपल्या खास अंदाजात साजरा केला, आणि सिडनीतील प्रेक्षकांनी उभं राहून त्याचं स्वागत केलं. (Virat Kohli Sidnry Record 2025)

56 चेंडूत अर्धशतक पूर्ण करून कोहलीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, तो अजूनही खऱ्या अर्थाने “किंग कोहली” आहे.

MHDU News : Vishal Bhdane Virat Kohli Sidnry Record 2025

Rohit Sharma SCG Century 2025
mhdunews #mhdusocial #ViratKohli #SachinTendulkar #KohliRecord #SydneyCricketGround #IndiaVsAustralia #CricketNews #KingKohli #KohliFans #SportsNews #MHDU

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

2 thoughts on “Virat Kohli Sidnry Record 2025 : सिडनीत विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म; सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *