Sharad Pawar & PM Modi reaction on Delhi blastशरद पवार आणि नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील स्फोटावर व्यक्त केली प्रतिक्रिया; पवारांनी पंतप्रधानांना सखोल चौकशीची मागणी केली.

Sharad Pawar & PM Modi reaction on Delhi blast

नवी दिल्ली : लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एकच्या बाहेर सोमवारी संध्याकाळी एका कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटात किमान ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर दिल्ली पोलिस, एनआयए, एनएसजी आणि इतर सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना थेट आवाहन केले आहे.

शरद पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिलं आहे की — (Sharad Pawar & PM Modi reaction on Delhi blast)

“आज दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नल परिसरात एका कारमध्ये झालेल्या स्फोटात झालेली जीवितहानी अतीव दुःखद आहे. मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो व ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करतो. जखमी नागरिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो.”

पुढे शरद पवार म्हणाले, “लाल किल्ल्यासारख्या संवेदनशील परिसरात घडलेली ही दुर्दैवी घटना फार चिंताजनक आहे. माझी देशाचे पंतप्रधान व गृहमंत्र्यांना विनंती आहे की, सदर घटनेबाबत सखोल चौकशी करावी. त्यायोगे येणारा चौकशी अहवाल देशासमोर ठेवून अशा दुर्घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या यंत्रणा ठोस पावलं उचलतील.”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले — (Sharad Pawar & PM Modi reaction on Delhi blast)

“आज संध्याकाळी दिल्लीत झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. बाधितांना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे. गृहमंत्री अमित शाह आणि इतर अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, “सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलवर आय-२० ह्युंदाई गाडीत स्फोट झाला असून, काही लोक जखमी झाले आहेत. एनएसजी, एनआयए आणि एफएसएलच्या पथकांकडून चौकशी सुरू आहे. सर्व शक्यतांचा सखोल तपास केला जात आहे आणि सत्य देशासमोर आणले जाईल.” (Sharad Pawar & PM Modi reaction on Delhi blast)

या घटनेमुळे दिल्लीसह देशभरात तणावाचे वातावरण असून सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे.

MHDU News : Vishal Bhadane

Sharad Pawar & PM Modi reaction on Delhi blast
शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील स्फोटावर व्यक्त केली प्रतिक्रिया; पवारांनी पंतप्रधानांना सखोल चौकशीची मागणी केली.

स्फोटाआधीचा पहिला सीसीटीव्ही फुटेज समोर; डॉक्टर उमर कारमध्ये काळा मास्क घालून बसलेला, गाडी कोणाची? मोठी माहिती समोर

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

2 thoughts on “Sharad Pawar & PM Modi reaction on Delhi blast : “घटना चिंताजनक”, पंतप्रधान मोदी म्हणाले…”
  1. Just tried my luck at 567win1 and had a blast. Graphics are sharp and the payouts seem fair. Gotta love a site that feels straightforward. Check it out 567win1 for some fun!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *