Rohit Sharma SCG Century 2025
सिडनी क्रिकेट ग्राउंड (SCG) वर झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाज रोहित शर्माने तुफानी शतक झळकावत विक्रमांची मालिका रचली आहे.
या शतकासह रोहित शर्मा आता तिन्ही आंतरराष्ट्रीय स्वरूपात ५० शतके झळकावणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी फक्त सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनीच हा टप्पा गाठला होता.
रोहितचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील ३३ वे शतक ठरले असून, त्याने तब्बल दोन वर्षांनी पुन्हा शतक झळकावले आहे. शेवटचे शतक त्याने २०२३ च्या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध झळकावले होते.
कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर रोहितला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. त्यामुळे त्याच्यावर साऱ्यांचे लक्ष केंद्रीत होते. पर्थमध्ये त्याची बॅट शांत होती, परंतु अॅडलेडमध्ये त्याने अर्धशतक झळकावून पुन्हा फॉर्म मिळवला आणि आता सिडनीत शतक ठोकून जबरदस्त पुनरागमन केले आहे.
या शतकासह रोहित शर्माने विराट कोहली आणि कुमार संगकारा यांना मागे टाकत, ऑस्ट्रेलियात सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावणारा परदेशी फलंदाज ठरला आहे. रोहितचे हे ऑस्ट्रेलियातील सहावे शतक असून कोहली आणि संगकाराकडे प्रत्येकी पाच शतके आहेत. (Rohit Sharma SCG Century 2025)
त्याच्या या शानदार कामगिरीनंतर सोशल मीडियावर “Hitman” च्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. चाहत्यांनी त्याला “King of Sydney” अशी उपाधी दिली आहे. (Rohit Sharma SCG Century 2025)
MHDU News : Vishal Bhadane
Rohit Sharma Virat Kohli Fly Australia ODI Team India | रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना; टीम इंडियासोबत 1 दिवसीय मालिकेसाठी प्रयाण
RohitSharma #RohitSharmaCentury #IndiaVsAustralia #CricketHighlights #RohitSharmaSCG #Hitman #Rohit50Centuries #CricketIndia #TeamIndia #BCCI #mhdunews #mhdusocial



[…] Rohit Sharma SCG Century 2025mhdunews #mhdusocial #ViratKohli #SachinTendulkar #KohliRecord #SydneyCricketGround #IndiaVsAustralia #CricketNews #KingKohli #KohliFans #SportsNews #MHDU […]
Gave 3cncbetbr a spin, and I have to say, I’m pretty impressed. Fast payouts and a good selection of games. Check it out: 3cncbetbr.
Alright, checked out e2bete2betlimted. The site’s design is great, easy to use and the games are easy to play. I’d recommend this site. e2bete2betlimted