Rohit Arya Encounter Mumbaiपवई ओलीसनाट्यातील आरोपी रोहित आर्या पोलिसांच्या गोळीबारात ठार, सर्व मुलांची सुरक्षित सुटका

Rohit Arya Encounter Mumbai

मुंबई – पवई परिसरातील आर ए स्टुडिओमध्ये झालेल्या ओलीसनाट्य प्रकरणाचा शेवट अखेर एनकाऊंटरमध्ये झाला आहे!
अभिनयाच्या नावाखाली १७ ते २० चिमुकल्यांना स्टुडिओत ओलीस ठेवल्याच्या प्रकरणात आरोपी रोहित आर्या याला पोलिसांनी ठार केलं आहे.

शनिवारी दुपारी पवईतील आर ए स्टुडिओमध्ये रोहित आर्यने मुलांना “ऑडिशन” देण्याच्या बहाण्याने आत बोलावलं आणि तिथेच सर्वांना ओलीस ठेवलं. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर थेट व्हिडिओ करून सांगितलं की, “मी दहशतवादी नाही, पण काही मॉरल आणि एथिकल प्रश्न आहेत. मला काही लोकांशी संवाद साधायचा आहे.”

या थरारक घटनेनंतर तात्काळ मुंबई पोलिस, NSG कमांडो आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दीड तासाच्या प्रयत्नांनंतर सर्व १७ मुलांना सुरक्षित बाहेर काढलं. मात्र, रोहित आर्या स्टुडिओच्या आतून पोलिसांवर गोळीबार करत होता. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि त्याच्या छातीत गोळी लागली.

त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिस सूत्रांनी सांगितले की, संपूर्ण परिसर काही काळ सील करण्यात आला होता आणि या कारवाईदरम्यान एकही मुलगा किंवा पोलीस जखमी झाला नाही.

रोहित आर्या हा स्वतःला फिल्म डायरेक्टर म्हणून सांगत होता. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं पोलिसांना प्राथमिक तपासात आढळलं आहे. त्याने “मॉरल जस्टिस” नावाच्या मोहिमेअंतर्गत लोकांशी संवाद साधण्याची मागणी केली होती. (Rohit Arya Encounter Mumbai)

मुंबई पोलिसांच्या जलद आणि अचूक कारवाईमुळे मोठं संकट टळलं आहे. सर्व मुलं सुरक्षित असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
या प्रकरणाचा तपास आता क्राइम ब्रँच आणि सायबर सेल एकत्रितपणे करत आहेत.

MHDU News : Vishal Bhdane Rohit Arya Encounter Mumbai

mhdunews #mhdusocial #MumbaiNews #PowaiNews #RohitAryaCase #BreakingStory #MHDUUpdates #ViralNews #ENCOUNTER

Mumbai Shock: 20 Kids Held Hostage in Powai Studio – Why Did Rohit Arya Do It? | मुंबईत २० चिमुकल्यांना ओलीस ठेवलं, नेमकं कारण काय? रोहित आर्याला नेमकं काय हवं होतं?

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

2 thoughts on “Rohit Arya Encounter Mumbai: Powai Hostage Case Ends in Gunfire | पवई ओलीसनाट्यातील आरोपी रोहित आर्यचा एनकाऊंटर; पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू”
  1. 6566bet1, cheguei pra testar e até agora tô impressionado. Os odds são competitivos e a variedade de jogos é show! Vamos ver se a banca sobe! Confere aqui: 6566bet1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *