Ram Sutar Maharashtra Bhushan Awardमहाराष्ट्राचे अभिमान – जागतिक शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण 2024’ पुरस्कार

Ram Sutar Maharashtra Bhushan Award

जागतिक ख्यातीचे मुक्त शिल्पकार राम सुतार हे भारतातील शिल्पकलेचे एक मानबिंदू मानले जातात. इ.स. 1925 मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे जन्मलेल्या सुतार यांनी जगभरातील पाचही खंडांमध्ये 200 हून अधिक शिल्पे साकारून भारतीय शिल्पकलेची सुवर्ण परंपरा पुढे नेली आहे. दिल्ली येथील संसद भवनाच्या प्रांगणातही त्यांच्या भव्य शिल्पकृतींची शोभा खुलून दिसते.

शिल्पकलेतील त्यांच्या अतुलनीय योगदानाच्या मान्यतेपोटी ज्येष्ठ शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन ‘महाराष्ट्र भूषण’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. (Ram Sutar Maharashtra Bhushan Award)

या विशेष कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राम सुतार यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा पुरस्कार त्यांच्या पुत्र अनिल सुतार यांनी स्वीकारला.

सुतार यांच्या शिल्पकृतींनी भारतातील महापुरुष, दिग्गज नेते आणि असंख्य ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांना भव्यतेने साकारले आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी त्यांच्या शिल्पकृती प्रेरणादायी मार्गदर्शक ठरतील, असे मत यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. त्यांनी नमूद केले की, “राम सुतारजींना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिल्याने, या पुरस्काराची मानमर्यादा अधिक वाढली आहे.” (Ram Sutar Maharashtra Bhushan Award)

जगभरात महाराष्ट्र आणि भारताचे नाव उज्वल करणाऱ्या ‘महाराष्ट्र भूषण’ राम सुतार यांच्यामुळे देशाची कीर्ती अधिक उंचावली आहे.
विश्वभर में महाराष्ट्र और देश का नाम ‘महाराष्ट्र भूषण’ राम सुतार जी इन्होंने प्रतिष्ठित किया।

(‘महाराष्ट्र भूषण 2024’ पुरस्कार प्रदान कार्यक्रम | दिल्ली | 14-11-2025)

MHDU News : Vishal Bhadane Ram Sutar Maharashtra Bhushan Award

लाडक्या बहिणींसाठी मोठा दिलासा! E-KYC साठी सरकारकडून अट शिथिल…..

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

3 thoughts on “Ram Sutar Maharashtra Bhushan Award : जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण ’ पुरस्कार – दिल्ली येथे सन्मान”
  1. I recently started looking for affiliate websites and eventually stumbled upon lunabetaffiliate. The website is decent and I believe anyone can work with it. If you are looking for a great way to start earning money, I advise that you visit the page here: lunabetaffiliate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *