Rajinikanth Spiritual Journey :
साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार आणि लाखोंच्या हृदयावर राज्य करणारे रजनीकांत हे केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नाही तर त्यांच्या साध्या जीवनशैलीसाठीही ओळखले जातात. कोट्यवधींची संपत्ती, अपार प्रसिद्धी आणि सुपरस्टारडम मिळूनही ते नेहमीच आध्यात्मिकतेकडे वळलेले आणि जमिनीशी जोडलेले जीवन जगताना दिसतात.
अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटोंनी पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे. या फोटोंमध्ये रजनीकांत (Rajinikanth Spiritual Journey) रस्त्याच्या कडेला पत्रावळीत साधं जेवण करताना दिसतात. साध्या वातावरणात, कोणत्याही दिखाव्याशिवाय घेतलेलं हे जेवण नेटकऱ्यांच्या मनाला भिडतंय.
Rajinikanth Spiritual Journey
📿 या आध्यात्मिक प्रवासात रजनीकांत यांच्यासोबत काही जवळचे मित्रही सहभागी झाले आहेत. आणखी एका व्हायरल फोटोत ते साध्या पांढऱ्या वस्त्रांमध्ये आश्रमातील स्थानिकांशी संवाद साधताना दिसतात. त्यांनी अलीकडेच ऋषिकेशमधील प्रसिद्ध स्वामी दयानंद आश्रमाला भेट दिली. तिथे त्यांनी स्वामी दयानंद यांना आदरांजली वाहिली, त्यांच्या स्मृतींना वंदन केलं आणि गंगा नदीच्या काठी ध्यान आणि गंगा आरतीत सहभाग घेतला.
ही भेट त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. त्यांच्या या प्रवासात दिसलेली साधेपणा, नम्रता आणि आध्यात्मिक जोड हीच गोष्ट पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात त्यांना अधिक खास बनवते.
🎬 अभिनयाच्या आघाडीवरही रजनीकांत सध्या तितकेच व्यस्त आहेत. त्यांनी नुकतंच ‘कूली’ (Coolie) या मल्टीस्टारर चित्रपटात काम केलं आहे. यात नागार्जुन, श्रुती हासन, रचिता राम, उपेंद्र आणि आमिर खान यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. गेल्या वर्षी टी.जे. ज्ञानवेल यांच्या ‘वेट्टैयन’ चित्रपटात त्यांनी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती, ज्यात अमिताभ बच्चन आणि राणा दग्गुबाती यांनीही भूमिका केल्या होत्या.
संपत्ती, प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर असूनही “थलायवा” रजनीकांत यांचा हा साधेपणा, अध्यात्मिकतेशी असलेला खोल संबंध आणि जमिनीशी नातं हेच त्यांना वेगळं आणि खास बनवतं.



[…] कोट्यवधींची संपत्ती असूनही थलायवा रज… […]