परभणी : परभणी परिसरात धावणारी राज्य परिवहन महामंडळाची बस आज प्रवासादरम्यान अचानक रस्त्यात बंद पडली. या घटनेमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.
व्हिडिओ बघा 👇
रोजच्या प्रवाशांचे म्हणणे आहे की, हा प्रकार नवीन नाही. “बस वारंवार बंद पडते, वेळेत धावत नाही. आम्ही भाडे वेळोवेळी वाढीव दराने भरतो, पण सेवा मात्र दिवसेंदिवस ढासळत चालली आहे,” असा संताप प्रवाशांनी व्यक्त केला.
प्रवाशांनी प्रशासनाला थेट प्रश्न विचारले की, लाडक्या बहिणींसाठी सवलत देताना तुम्ही जाहीर करता, पण प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत आणि सोयीबाबत का बदल करत नाही? वारंवार भाडेवाढ करून वसुली केली जाते, पण गाड्यांची दुरवस्था तशीच आहे.
ग्रामस्थ आणि प्रवाशांनी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला असून, तातडीने बसेसची देखभाल सुधारावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा दिला आहे.

