Paithan Accident :
पैठण : शहराजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. शशिविहार वसाहतीच्या गेटसमोर शेवगावकडून येणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने पैठणचे माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पिसे आणि शिक्षक संभाजी कर्डिले यांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात शुक्रवारी रात्री सुमारे १०:४५ वाजता घडला.
Accident चा व्हिडिओ पाहा 👇
Paithan Accident
शशिविहार वसाहतीमध्ये राहणारे माजी उपनगराध्यक्ष तसेच संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब पिसे आणि त्यांचे शेजारी शिक्षक संभाजी कर्डिले हे दोघे दुचाकीवरून जात असताना अचानक समोरून येणाऱ्या कारने त्यांना जोरात धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की कारचा समोरील भाग चक्काचूर झाला आणि दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांच्या हस्तक्षेपाने दोघांनाही तात्काळ पैठण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीदरम्यान दोघांनाही मृत घोषित केले, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक प्रमोद यादव यांनी दिली.
या Paithan Accident घटनेने पैठण शहरात शोककळा पसरली आहे. माजी उपनगराध्यक्ष पिसे यांच्या निधनाने स्थानिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून शिक्षक कर्डिले यांच्या अकाली मृत्यूने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

