Nashik Woman Police Crime
नाशिक (MHDU News): नाशिक पोलिसांनी अलीकडेच गुन्हेगारांविरोधात जोरदार मोहीम सुरू आहे. अनेक संवेदनशील प्रकरणांवर थेट कारवाई सुरू झाल्याने शहरात चर्चा रंगली आहे. पण याच मोहिमेदरम्यान घडलेल्या एका प्रकाराने संपूर्ण पोलिस विभाग हादरला आहे.
अवैध सावकारी प्रकरणात पोलिसांनी कैलास मैद याला ताब्यात घेतले. त्याच्यावर व्याज वसुली आणि धमकावणे याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो पोलिसांच्या रडारवर होता. अखेर दीर्घ पाठलागानंतर पोलिसांनी त्याला पकडले. (Nashik Woman Police Crime)
मात्र, चौकशी सुरू असतानाच परिस्थिती पलटी झाली. सारिका मैद, जी स्वतः पोलिस खात्यात काम करते, थेट ठाण्यात पोहोचली आणि चौकशी थांबवण्याचा प्रयत्न केला. साक्षीदारांच्या माहितीनुसार, तिने अधिकाऱ्यांना दम दिला आणि उपस्थित कर्मचाऱ्याशी वाद घातला. (Nashik Woman Police Crime)
तिने काही ओळखीच्या लोकांना फोन करून ठाण्यात बोलावल्याने तिथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही वेळ पोलीस अधिकारीही संभ्रमात पडले. (Nashik Woman Police Crime)
या घटनेची माहिती पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी तत्काळ कठोर कारवाईचे आदेश दिले. संबंधित सारिका मैद आणि तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली असून, पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
नाशिकमध्ये अवैध सावकारीविरोधात पोलिसांची मोहीम सुरू असताना, अशा घटना पोलिस यंत्रणेसाठी प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. नागरिक मात्र अशा कारवाईबद्दल पोलिसांचे समर्थन करत आहेत.
MHDU News : Vishal Bhadane


[…] नाशिक क्राईम: ‘कायद्याचा बालेकिल्ला’… […]
Fala galera do bolão! A apostaganha4 parece ter umas apostas interessantes. Preciso dar uma olhada com mais calma, mas a primeira impressão foi boa. Quem sabe a gente não faz uns gains por lá? Confere aí: apostaganha4
Hey, sports fans! Fun88vn-sport seems to have some decent odds. I had a quick look at the site and it seems user friendly. Give it a shot if you’re feeling lucky! fun88vn-sport