Nashik Wine Production Drop 2025नाशिकमध्ये सलग पावसाचा फटका; वाइन उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता!

Nashik Wine Production Drop 2025

नाशिक: गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या सलग पावसामुळे द्राक्ष बागांवर मोठा परिणाम होत असून, त्याचा थेट फटका वाइन उत्पादनालाही बसण्याची शक्यता आहे. वाइन उद्योग तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, चालू हंगामात नाशिकच्या वाइन उत्पादनात तब्बल ५० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.

सध्या देशभरात सुमारे १२० वाइनरी असून, त्यापैकी ७० वाइनरी केवळ नाशिक जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सर्वाधिक द्राक्ष आणि वाइन उत्पादन होते. देशात दरवर्षी सुमारे ३ कोटी लिटर वाइन तयार होते. यातील केवळ ७ ते ८ टक्के वाइनच निर्यातीसाठी पाठवली जाते, तर उर्वरित उत्पादन देशांतर्गत बाजारपेठेत विकले जाते. त्यामुळे उत्पादनात घट झाली, तरी निर्यात फारशी बाधित होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, मागील काही वर्षांत वाइन विक्रीत अपेक्षित वाढ दिसून आली नाही. त्यामुळे सध्या वाइन उत्पादकांकडे पर्याप्त साठा उपलब्ध आहे. परंतु, सलग पावसामुळे द्राक्षाचे उत्पन्न घटल्यास पुढील वर्षीच्या उत्पादनावर आणि विक्रीवर त्याचा थेट परिणाम जाणवू शकतो. (Nashik Wine Production Drop 2025)

वाइन उत्पादकांच्या अंदाजानुसार, सध्याचे ३ कोटी लिटर उत्पादन कमी होऊन दीड कोटी लिटरपर्यंत जाऊ शकते. याबाबतचा अंतिम अंदाज डिसेंबर महिन्यात स्पष्ट होईल. याशिवाय, ‘फ्री ट्रेड’ धोरणामुळे विदेशी वाइनच्या विक्रीला चालना मिळत असल्याने देशांतर्गत वाइन बाजाराला आणखी स्पर्धा निर्माण झाली आहे.

सध्याच्या हवामान परिस्थितीचा आणि बाजारातील ट्रेंडचा विचार करता, पुढील वर्ष वाइन उद्योगासाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. (Nashik Wine Production Drop 2025)

MHDU News : Vishal Bhadane

Nashik Wine Production Drop 2025
नाशिकमध्ये सलग पावसाचा फटका; वाइन उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता!

Nashik Crime Bagul Gang :बागुल टोळीचा नवा कारनामा! प्लॉटचा बळजबरीने ताबा घेत 57 लाखांची वसुली; मामा राजवाडे, अजय बागुलवर आणखी गुन्हा

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

2 thoughts on “Nashik Wine Production Drop 2025 : पावसाचा फटका! नाशिकच्या वाइन उत्पादनात तब्बल 50 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *