नाशिक शहरात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. सिडकोतील इंदिरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका 38 वर्षीय कामगाराचा दगडाने ठेचून खून केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीची ओळख
मृत व्यक्तीचे नाव संतोष काळे (वय 38, रा. लेखा नगर झोपडपट्टी) असे असून, त्याचा खून ओळखीच्या व्यक्तीकडून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटना कशी उघड झाली?
नेहमीप्रमाणे रात्री उशिरापर्यंत मुलगा घरी न आल्याने संतोष काळे यांच्या वडिलांनी थेट इंदिरा नगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून शोध घेत असता, गरवारे बस स्टॉप परिसरात रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला.
👉 “या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ पाहा :
पोलिसांचा तपास
या प्रकरणाची नोंद इंदिरा नगर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
परिसरात भीतीचे वातावरण
कामगाराचा अशा प्रकारे खून झाल्याने सिडको आणि इंदिरा नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांमध्ये या घटनेबाबत चर्चेला उधाण आले असून, पोलिसांकडून आरोपीचा तातडीने शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
👉 “अशाच आणखी स्थानिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा”: Nashik Murder Case : सिडको – इंदिरा नगर परिसरात 38 वर्षीय कामगाराचा दगडाने ठेचून खून
