Nashik RTO News :
नाशिक : नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर नाशिककरांनी यंदा वाहन खरेदीचा धडाका लावला असून प्रादेशिक परिवहन (Nashik RTO News) कार्यालयाला (आरटीओ) तब्बल ₹23 कोटी 23 लाख 57 हजार 489 रुपयांचा रेकॉर्डब्रेक महसूल प्राप्त झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी महसुलात ₹3 कोटी 76 लाख 69 हजार 538 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.
सण-उत्सव काळात पारंपरिकरीत्या घर, सोने-चांदी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसोबतच दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदा नवरात्रोत्सव काळात नागरिकांनी नवीन वाहनांकडे मोठ्या प्रमाणात धाव घेतली असून, आरटीओ कार्यालयात एकूण 3,644 नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे.
नोंद झालेल्या वाहनांमध्ये 1,609 दुचाकी, 1,596 चारचाकी, 34 ट्रॅक्टर, 4 बस, 2 बांधकाम उपकरणे, 1 क्रेन, 7 डंपर, 4 उत्खनन यंत्र, 265 गुड्स कॅरिअर, 2 हार्वेस्टर, 40 मोटार कॅब, 69 प्रवासी रिक्षा, 4 थ्री-व्हीलर गुड्स कॅरिअर आणि 1 जनरेटर व्हॅन यांचा समावेश आहे.
📈 महसूल वाढीचा आकडा प्रभावी
2024 मध्ये आरटीओ महसूल ₹19 कोटी 46 लाख 87 हजार 952 रुपये होता, तर 2025 मध्ये हा महसूल वाढून ₹23 कोटी 23 लाख 57 हजार 489 रुपये झाला आहे. यामुळे केवळ महसूलच वाढला नाही तर वाहन नोंदींची संख्याही वाढली आहे.
🚗 चारचाकी वाहनांची मागणी आघाडीवर
गेल्या वर्षीपेक्षा यंदा 298 वाहनांची अधिक नोंद झाली आहे. विशेष म्हणजे चारचाकी वाहनांच्या विक्रीत तब्बल 504 वाहनांची वाढ, तर दुचाकी विक्रीत 192 वाहनांची घट झाली आहे. डंपर, प्रवासी रिक्षा आणि थ्री-व्हीलर गुड्स कॅरिअर यामध्ये थोडी घट झाली आहे.
आरटीओ अधिकाऱ्यांच्या मते, जीएसटी दरात झालेल्या घटेमुळे चारचाकी वाहनांची मागणी वाढली, तसेच व्यावसायिक वाहनांवरील रोड टॅक्स वाढल्याने महसूलही वाढला आहे.
Nashik RTO News
Nashik Murder Shocked City Again – प्रॉपर्टी वादातून अमोल मेश्राम यांची निर्घृण हत्या



[…] […]
[…] […]