Nashik Rahuri Minor Girl Abduction
राहुरी तालुक्यात कॉलेजला जात असताना १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या पाच दिवसांत मुलीची सुटका करून तिघा आरोपींना अटक केली आहे. (Nashik Rahuri Minor Girl Abduction )
शुक्रवारी (ता. १३) सकाळी सुमारे नऊच्या सुमारास ही मुलगी कॉलेजला जात असताना तिचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली “ऑपरेशन मुस्कान” अंतर्गत विशेष पथक तयार करून शोधमोहीम सुरू करण्यात आली. (Nashik Rahuri Minor Girl Abduction )
तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे पोलिसांना मुलीचा ठावठिकाणा लागला. बुधवारी (ता. १८) रात्री नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ला परिसरातील जंगलात धाड टाकून पोलिसांनी मुलीची सुटका केली. त्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून आज तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणी मुख्य आरोपी मुक्तार हैदर पठाण (वय १८) याच्यासह त्याला मदत करणारे कौसर हैदर पठाण (वय २२) आणि आकाश शरद संसारे (वय १९) यांना अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या जबाबानुसार आरोपीने अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानुसार अपहरणाच्या गुन्ह्यासोबतच पोक्सो आणि लैंगिक अत्याचाराच्या कलमांनुसार गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे. (Nashik Rahuri Minor Girl Abduction )
पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांच्यासह पोलिस कर्मचारी चांद पठाण, प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे, नदीम शेख यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. इतर अधिकाऱ्यांनीही या कारवाईत सहकार्य केले.
अल्पवयीन मुलीच्या सुटकेमुळे कुटुंबीयांना दिलासा मिळाला असला तरी या घटनेमुळे तालुक्यात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Nashik Rahuri Minor Girl Abduction )
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समाज आणि प्रशासनासमोर गंभीरतेने उभा राहिला आहे.
MHDU News : Vishal Bhadane

नाशिकमध्ये 40 सिग्नल चौकांवर डिजिटल नजर; नियमभंगावर थेट कारवाईची नवी व्यवस्था
Nashik Rahuri Minor Girl Abduction
A shocking incident of abduction involving a 15-year-old minor girl has come to light in Rahuri taluka. The girl was kidnapped while on her way to college, creating panic in the locality. However, the police acted swiftly and rescued her within five days, arresting three accused in the case.
The incident occurred on Friday (13th) around 9 AM. A complaint was registered at Rahuri Police Station, and under the guidance of Police Inspector Sanjay Thenge, a special team was formed under “Operation Muskaan” to trace the victim.
Based on technical analysis and confidential inputs, the police traced the location of the abducted girl. On Wednesday (18th) night, the police team conducted a search operation in the forest area near Ramshej Fort in Nashik district and successfully rescued her. After medical examination, she was handed over to her parents.
The main accused, Muktar Haidar Pathan (18), along with his associates Kausar Haidar Pathan (22) and Akash Sharad Sansare (19), has been arrested. Based on the victim’s statement, additional charges under kidnapping, POCSO, and sexual assault sections have been invoked.
The successful operation has brought relief to the family, but the incident has once again raised serious concerns about women’s safety in the region.
नाशिकमध्ये 40 सिग्नल चौकांवर डिजिटल नजर; नियमभंगावर थेट कारवाईची नवी व्यवस्था


[…] […]