Nashik Police Driver Bharti 2025 – नाशिक पोलीस चालक भरतीची सविस्तर माहितीनाशिक पोलीस चालक भरती 2025 — पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा आणि शारीरिक चाचणी याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Nashik Police Driver Bharti 2025

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 प्रक्रिया सुरू झाली असून नाशिक ग्रामीण पोलीस विभागात 52 चालक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया 29 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होऊन 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. अधिकृत जाहिरात आणि अर्ज लिंक वरील विभागात दिलेली आहे.

या भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, लेखी परीक्षा पद्धत आणि शारीरिक चाचणी निकष याबद्दलची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

🎓 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): (Nashik Police Driver Bharti 2025)

पोलीस शिपाई चालक पदासाठी उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा.
तसेच वैध वाहनचालक परवाना (LMV/HMV) आवश्यक आहे.
भरती प्रक्रियेत काही बदल झाल्यास त्याची अद्ययावत माहिती अधिकृत वेबसाईटवर व महाभरती पोर्टलवर प्रकाशित केली जाईल.

⚖️ वयोमर्यादा (Age Limit): (Nashik Police Driver Bharti 2025)

वर्ग वयोमर्यादा

खुला वर्ग (General) 18 ते 28 वर्षे
राखीव वर्ग (Reserve) 18 ते 33 वर्षे

🧍‍♂️ शारीरिक पात्रता (Physical Eligibility): (Nashik Police Driver Bharti 2025)

निकष पुरुष महिला

उंची किमान 165 से.मी. किमान 158 से.मी.
छाती न फुगवता 79 से.मी. पेक्षा कमी नसावी लागू नाही

📚 लेखी परीक्षा पद्धत (Written Examination Pattern):

लेखी परीक्षा ही 100 गुणांची असेल आणि 90 मिनिटांचा वेळ दिला जाईल.
प्रश्नपत्रिका मराठी भाषेत असेल.

विषय गुण

अंकगणित 20 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 20 गुण
बुद्धीमत्ता चाचणी 20 गुण
मराठी व्याकरण 20 गुण
मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 20 गुण
एकूण गुण 100 गुण

💪 शारीरिक चाचणी (Physical Test Details):

♂️ पुरुष उमेदवारांसाठी:

प्रकार गुण

11240 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक 10 गुण
एकूण गुण 50 गुण

♀️ महिला उमेदवारांसाठी:

प्रकार गुण

800 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक (4 किलो) 10 गुण
एकूण गुण 50 गुण

🚗 वाहनचालक कौशल्य चाचणी (Driving Skill Test):

शारीरिक चाचणीपूर्वी उमेदवारांची 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेतली जाईल.

वाहन चालविताना सुरक्षा नियम, ट्रॅफिक सिग्नल, आणि वाहन नियंत्रण या बाबी तपासल्या जातील.

💰 अर्ज शुल्क (Application Fees):

वर्ग शुल्क

खुला वर्ग (General) ₹450
राखीव वर्ग (Reserve) ₹350
माजी सैनिक (Ex-Serviceman) शुल्क नाही

🧩 निवड प्रक्रिया (Selection Procedure):

  1. लेखी परीक्षा
  2. वाहनचालक कौशल्य चाचणी (50 गुण)
  3. शारीरिक चाचणी (50 गुण)
  4. चारित्र्य पडताळणी
  5. वैद्यकीय तपासणी

📎 महत्वाच्या लिंक्स (Important Links):

📄 PDF जाहिरात: https://shorturl.at/c9mBa

🖥️ ऑनलाईन अर्ज: https://shorturl.at/pNC2U

🌐 अधिकृत वेबसाइट: https://www.nashikruralpolice.gov.in

🚨 भरती पोर्टल: https://policerecruitment2025.mahait.org

MHDU News : Vishal Bhadane Nashik Police Driver Bharti 2025

Nashik Police Driver Bharti 2025 – नाशिक पोलीस चालक भरतीची सविस्तर माहिती
नाशिक पोलीस चालक भरती 2025 — पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा आणि शारीरिक चाचणी याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Maharashtra Land Records Recruitment 2025: Great Opportunity, महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात 903 पदांसाठी मेगा भरती

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

3 thoughts on “Nashik Police Driver Bharti 2025 – नाशिक पोलीस चालक भरती 2025 साठी आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत आणि शारीरिक चाचणीची सविस्तर माहिती!”
  1. Alright gamers, heard anything about j884genuk? Anyone wanna fill me in on all the happenings in this site? I have been digging online and wanted to get the inside scoop j884genuk!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *