Nashik Loan Froud Rohit Vig Arrested नाशिक इंदिरानगर पोलिसांची मोठी कारवाई — बळजबरीने चार फ्लॅट बळकावणाऱ्या सावकाराला अटक

Nashik Loan Froud Rohit Vig Arrested

नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला! नाशिक पोलिस कायम सज्ज!
नाशिक शहरातील इंदिरानगर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत बळजबरीने फ्लॅट स्वतःच्या नावावर करून घेणाऱ्या सावकाराला अखेर अटक केली आहे.

संशयित आरोपी रोहीत प्रकाश विग (वय 37, रा. सातपूर, नाशिक) याने सन 2021 मध्ये फिर्यादीस ₹15 लाख रुपये 10% व्याजाने दिले होते. मात्र, फिर्यादीने आतापर्यंत तब्बल ₹25.28 लाख परत केले असतानाही आरोपीने धमक्या देत समृद्धी अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 201, 401, 402 आणि 403 स्वतःच्या नावावर करून घेतले.

तसेच, फिर्यादीला जबरदस्तीने गाडीत बसवून रजिस्ट्रेशन दस्त लिहून घेण्यात आला असल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Nashik Loan Froud Rohit Vig Arrested)

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारे काही लोकांची फसवणूक केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

नाशिक पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, गुन्हेगारीला नाशिक जिल्ह्यात स्थान नाही!
नाशिक पोलिस कायम सज्ज आहेत आणि नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Nashik Loan Froud Rohit Vig Arrested)

MHDU News : Vishal Bhadane Nashik Loan Froud Rohit Vig Arrested

NashikCrime #IndiranagarPolice #NashikNews #NashikPoliceAction #LoanFraud #CrimeNews #MHDUnews #mhdusocial

Nashik Crime Bagul Gang :बागुल टोळीचा नवा कारनामा! प्लॉटचा बळजबरीने ताबा घेत 57 लाखांची वसुली; मामा राजवाडे, अजय बागुलवर आणखी गुन्हा

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

3 thoughts on “Nashik Loan Froud Rohit Vig Arrested : नाशिक इंदिरानगर पोलिसांकडून 4 फ्लॅट बळकावणाऱ्या सावकारास अटक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *