Nashik Crime Bagul Gang
नाशिक | विसे मळा गोळीबारप्रकरणी नाशिकरोड कारागृहात असलेल्या बागुल टोळीवर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. प्लॉटचा जबरदस्तीने ताबा घेऊन 57 लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी, तसेच जागा परत देण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची मागणी केल्याच्या प्रकरणी भाजपचे मामा राजवाडे, अजय बागुल, संजय राठी, महेश राठी, बाळासाहेब ऊर्फ भगवंत पाठक आणि इतर 20 जणांविरुद्ध म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे बागुल टोळीच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत प्रकाशात न आलेला बाळासाहेब पाठक याचे नाव पहिल्यांदाच रेकॉर्डवर आले आहे. (Nashik Crime Bagul Gang)
फिर्यादी चंदन गोटीराम भोईर (वय 40) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी लोखंडी रॉड आणि दांडक्यांसह त्यांच्या घरात जबरदस्ती प्रवेश करून कम्पाउंड, शेड आणि बोर्ड तोडले, तसेच प्लॉटचा जबरदस्ती कब्जा घेतला. प्रतिकार करताच संजय राठी आणि प्रतिक लोळगे यांनी भोईर यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो वार चुकला.
त्यानंतर आरोपींनी धमक्या देत भोईर कुटुंबाकडून 57 लाख रुपये घेतले. त्यानंतर जागा परत मिळवून देण्यासाठी अजय बागुल, मामा राजवाडे आणि बाळासाहेब पाठक यांनी 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली, अन्यथा जीव घेण्याची धमकी दिली. (Nashik Crime Bagul Gang)
संपूर्ण कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून या टोळीच्या दहशतीखाली वावरत होते. गोळीबार, पंजाब बारप्रकरणी अटक झाल्यानंतरच त्यांनी पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली. या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक उमेश बोरसे करत असून वरिष्ठ निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
MHDU News : Vishal Bhadane Nashik Crime Bagul Gang

नाशिक येथील उज्जैनवाल टोळीतील 4 महिन्यांपासून फरार आरोपी उपनगर पोलिसांच्या जाळ्यात!


[…] […]
[…] […]
[…] […]
Sup folks! jljl533 looks legit enough. Have a gander at jljl533
I bumped into 88clb8gq com lately.. and I am actually digging it. Give it a shot if you’re after something new.