Pipeline Road Nashik accident of 8-year-old girl Navika NerkarPipeline Road Nashik: 8-year-old girl Navika Nerkar lost her life in a tragic accident near Jio petrol pump.

Nashik 8 Year Old Girl Accident

आज दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी अंदाजे 10 वाजेच्या सुमारास नाशिकमधील पाइपलाइन रोड, गणेश नगर, Jio पेट्रोल पंप जवळ एक हृदयस्पर्शी आणि भीषण अपघात घडला.
या अपघातात नविका नेरकर (वय 8 वर्षे) या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी नविका आपल्या आजीबरोबर स्विमिंगला जात असताना एका हेवी वाहनाने (ट्रक) त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रक ड्रायव्हर न थांबता पुढे गेला आणि दुर्दैवाने चिमुरडीला चिरडत निघून गेला.

https://www.mappls.com/place-satpur+police+station-trambakeshwar+road-satpur+colony-nashik-maharashtra-422007-fcte17@zdata=MTkuOTkxNDcyKzczLjc0Mjg1OCsxNytmY3RlMTcrK25yedसातपूर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
ॲम्ब्युलन्सला घटनास्थळी पोहोचण्यासाठी वेळ लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला. अनेक नागरिकांनी राग व्यक्त करत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, माजी नगरसेविका रेणा गांगुर्डे घटनास्थळी दाखल झाल्या व नेरकर परिवाराला धीर देत प्रशासनाला या घटनेवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले.

स्थानिक नागरिकांनी (Nashik 8 Year Old Girl Accident) संताप व्यक्त करत सांगितले की, “हा रस्ता नेहमी रहदारीचा असून आम्ही अनेकदा स्पीड ब्रेकर व वाहतुकीवरील नियंत्रणाची मागणी केली होती, परंतु प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही. आता तरी या घटनेनंतर प्रशासन जागे होईल का?” असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

या घटनेमुळे गणेश नगर परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून प्रशासनाविरोधात तीव्र भावना व्यक्त होत आहेत.

Nashik 8 Year Old Girl Accident

Nashik Crime: फडणवीस म्हणाले — नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांना पूर्ण अधिकार

PipelineRoad #NashikNews #NashikAccident #NavikaNerkar #MHDUnews #mhdunews #mhdusocial

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

2 thoughts on “Nashik 8 Year Old Girl Accident Navika Nerkar | पाइपलाइन रोडवर भीषण अपघात, आठ वर्षांच्या नविका नेरकरचा जागीच मृत्यू”
  1. […] https://mhdu.in/nashik-8-year-old-girl-accident/Tragic Accident on Pipeline Road Nashik – 8-Year-Old Girl Navika Nerkar Dies in Heavy Vehicle Collision | पाइपलाइन रोडवर भीषण अपघात, आठ वर्षांच्या नविका नेरकरचा जागीच मृत्यू […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *