नंदुरबार : मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे शासकीय रुग्णालयांचे रूपांतर
नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांचा चेहरामोहरा एका रात्रीत बदलल्याचे चित्र समोर आले आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यामुळे ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये ‘पंचतारांकित’ सेवांसारखी दिसू लागली.
✅ स्वच्छ वार्ड व परिसर
✅ सुगंधीत फवारणी
✅ प्रत्येक खाटेवर गादी व नवी चादर
✅ औषधांचा मुबलक साठा
✅ आस्थेने विचारपूस करणारे वैद्यकीय अधिकारी
✅ जेवणाच्या गुणवत्तेत बदल
यामुळे रुग्णांना ज्या सेवेसाठी रोज संघर्ष करावा लागतो, ती सेवा फक्त मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे उपलब्ध झाल्याचे दिसले.
आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालय, डाब पीएचसी, मोलगी ग्रामीण रुग्णालय, बिलगाव पीएचसी, धडगाव व तळोदा उपजिल्हा रुग्णालय येथे पाहणी केली. त्यांनी रुग्णांशी संवाद साधताना सेवा कशी आहे याविषयी विचारले असता, “हा बदल आजच झालाय” असे रुग्णांनी स्पष्ट सांगितले. त्यामुळे या ‘धावपळीच्या आरोग्यसेवेची’ पोलखोल झाली.
अतिदुर्गम भागातील आदिवासी रुग्णांना मिळणाऱ्या या तात्पुरत्या सुधारणेमुळे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे की 👉
“मंत्र्यांनी महिन्यातून एकदा तरी अचानक दौरा करावा, जेणेकरून आरोग्य यंत्रणा खऱ्या अर्थाने सुधारेल.”

