Mukesh Shahane Crime :
नाशिक : पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात सुरू असलेल्या गुन्हेगारीविरोधी मोहिमेची तीव्रता आणखी वाढताना दिसत आहे. सिडको परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane Crime) आणि मयूर शेवाळे, तसेच दोन वकिलांची गुन्हे शाखा युनिट-१ कडून जवळपास चार तास कसून चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान गोपनीयता काटेकोरपणे पाळण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण सात जणांची विशिष्ट पद्धतीने चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी “गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडायचं नाही” हे ठाम धोरण स्वीकारल्यामुळे शहरातील गुन्हेगारीविरोधी कारवाई अधिक जोमाने सुरू आहे. सिडको परिसरात वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या प्रकरणांमुळे पोलिसांनी आता थेट या भागावर लक्ष केंद्रीत केले आहे.
मात्र, मुकेश शहाणे यांची चौकशी कोणत्या प्रकरणात झाली, याचा अधिकृत तपशील अद्याप मिळालेला नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच “मीच पोलिस आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत” असे स्पष्ट केले होते. त्यामुळे पोलिस दलाचा आत्मविश्वास वाढला असून, ही मोहीम अधिक वेगाने राबवली जात आहे.
या चौकशीमुळे नाशिकमधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपमधील काही नगरसेवक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींमध्ये स्पष्ट अस्वस्थता दिसत आहे. पोलिसांच्या रडारवर आता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींशी जवळीक असलेले काही राजकीय चेहरेही आल्याचेही वृत्त आहे.
Mukesh Shahane Crime
Nashik Crime: BJP Leader Sunil Bagul’s Nephew Ajay Bagul Arrested – भाजप नेते सुनील बागूल यांच्या पुतण्याला अटक; नाशिक पोलिसांची मोठी कारवाई
https://mhdu.in/prakash-londhe-secret-bunker-nashik-crime/Nashik Crime: Secret Bunker Found in RPI Leader Prakash Londe’s Office – आरपीआय नेत्याच्या कार्यालयात सापडलं गुप्त भुयारघर
Nashik #Crime #PoliceAction #MukeshShahane #BJP #SandeepKarnik #NashikCrime #CIDCO #DevendraFadnavis #MHDU #NashikPolitics #mhdunews #mhdusocial


[…] […]
[…] […]