MRF Supercross Nashik 2025
नाशिककरांसाठी एक जबरदस्त मोटरस्पोर्ट्स पर्वणी सजली आहे! 🏍️
प्रसिद्ध एम आर एफ मोग्रीप एफएमएससीआय नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशिप 2025 ची तिसरी फेरी आता नाशिकमध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा शनिवार, १ नोव्हेंबर २०२५ रोजी ठक्कर डोम, सिटी सेंटर मॉल जवळ, नाशिक येथे पार पडणार आहे.
ही स्पर्धा फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (FMSCI) — भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या मान्यताप्राप्त मोटरस्पोर्ट्स महासंघ — यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली जात आहे. गेल्या २५ वर्षांपासून गॉडस्पीड रेसिंग या संस्थेमार्फत या स्पर्धेचे आयोजन केले जात असून, सात वेळा राष्ट्रीय विजेता ठरलेले शाम कोठारी यांच्या नेतृत्वाखाली ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. (MRF Supercross Nashik 2025)
या फेरीचे यशस्वी आयोजन सुरज कुटे, मोहन पवार, हर्षल कडभाने, विक्रम राजपूत, अमित सूर्यवंशी, आनंद बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हाताळले आहे. त्यांनी नाशिकमध्ये तयार केलेला ट्रॅक वेगवान आणि आव्हानात्मक असून, त्यात १५ जम्प्स, १ टेबलटॉप आणि १ कट टेबलटॉप समाविष्ट आहे. (MRF Supercross Nashik 2025)
सुपरक्रॉस ही स्पर्धा कृत्रिमरित्या तयार केलेल्या ट्रॅकवर घेतली जाते, ज्यात उंचवटे आणि वळणांनी भरलेला मार्ग असतो. या मार्गावरून उड्या घेत जाणारे स्पर्धक प्रेक्षकांसाठी प्रचंड आकर्षण ठरतात. मोटरस्पोर्ट्सची आवड वाढत असल्याने आणि माध्यमांमधून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे या स्पर्धेप्रकाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

या फेरीसाठी देशभरातून तब्बल १२५ स्पर्धक सहभागी होणार आहेत. नाशिकचे मोटरस्पोर्ट्स क्षेत्रातील योगदान मोठे असून, येथील प्रेक्षकांना या खेळाची चांगली जाण आहे. त्यामुळे मैदानावर ऊर्जा आणि उत्साह ओसंडून वाहतो.
एफएमएससीआय चे मुख्य प्रबंधक म्हणून रवी श्यामदासानी हे कार्य पाहणार आहेत, तर मनीष चिटको आणि सत्यजित नायक हे अधिकारी विशेष पाहुणे असतील. वाहन तपासणी अंकित गज्जर यांच्याकडे सोपविण्यात आली असून, तांत्रिक समिती प्रमुख म्हणून रवी वाघचौरे काम पाहणार आहेत. (MRF Supercross Nashik 2025)
स्पर्धेत SX1 गट विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार असून, टीव्हीएस रेसिंग टीम च्या सहभागामुळे तगडी लढत अपेक्षित आहे.
या स्पर्धेसाठी एम आर एफ टायर्स लि., टीव्हीएस मोटार कंपनी, सिडविन एनर्जी, मॉन्स्टर एनर्जी आणि आयओसी सर्वो हे प्रायोजक लाभले आहेत. (MRF Supercross Nashik 2025)
शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी वाहन आणि कागदपत्र तपासणी होईल, तर शनिवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी सराव आणि दुपारी १ वाजता मुख्य स्पर्धा सुरू होईल.
आयोजक शाम कोठारी आणि सुरज कुटे यांनी नाशिककरांना आवाहन केले आहे की, या अद्भुत स्पर्धेचा प्रत्यक्ष आनंद घ्यावा आणि आपल्या शहरातील मोटरस्पोर्ट्स संस्कृतीचा अभिमान बाळगावा.
MHDU News : Vishal Bha0dane MRF Supercross Nashik 2025
Londhe Gang Sandip Gangurde Arrested


[…] MRF Supercross Nashik 2025 : नाशिकमध्ये रंगणार एम आर एफ … […]
[…] MRF Supercross Nashik 2025 : नाशिकमध्ये रंगणार एम आर एफ … […]
Blaze-4 is legit, been playing there for a while now. Good selection of games and fast payouts. Check it out! blaze-4
Been putting some time into 3389bet recently for the sports bets. So far, so good! They’ve got a pretty comprehensive range of events. I recommend trying it out 3389bet