MPSC Main Exam 2025
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ संदर्भात महत्त्वपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १४ मार्च २०२६ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वपरीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरणे अत्यंत आवश्यक आहे.
आयोगाच्या माहितीनुसार, राज्य सेवा मुख्य परीक्षा २९ मार्च ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत टप्प्याटप्प्याने घेतली जाणार आहे. राज्यातील नाशिक, पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि नवी मुंबई या शहरांमध्ये परीक्षा केंद्रे असणार आहेत. (MPSC Main Exam 2025)
गेल्या वर्षी मार्च महिन्यात या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर ८ जानेवारी आणि २० फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धिपत्रकांमधून पदसंख्या वाढवण्यात आली. आता एकूण १३९ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. (MPSC Main Exam 2025)
यावेळी परीक्षा पद्धतीमध्ये देखील महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपात परीक्षा घेतली जात होती. मात्र आता वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेतली जाणार असल्यामुळे उमेदवारांना अधिक सखोल तयारी करावी लागणार आहे. (MPSC Main Exam 2025)
📚 परीक्षेचे स्वरूप:
भाषा पेपर १ आणि भाषा पेपर २ प्रत्येकी ३०० गुणांचे असतील. या दोन्ही पेपरमध्ये २५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. अंतिम गुणवत्ता यादीसाठी पेपर क्रमांक ३ ते ९ या पेपरचे एकूण १७५० गुण विचारात घेतले जाणार आहेत. तसेच मुलाखतीसाठी २७५ गुण ठेवण्यात आले आहेत.
पेपर क्रमांक ३ ते ७ उमेदवारांना मराठी किंवा इंग्रजी या पैकी एका भाषेत लिहिण्याची मुभा असेल. मात्र सर्व पेपर एकाच भाषेत लिहिणे बंधनकारक राहणार आहे.
📅 परीक्षेचे वेळापत्रक: (MPSC Main Exam 2025)
२९ मार्च – भाषा पेपर १ आणि भाषा पेपर २
५ एप्रिल – निबंध (पेपर ३)
१८ एप्रिल – सामान्य अध्ययन १ (पेपर ४) व सामान्य अध्ययन २ (पेपर ५)
१९ एप्रिल – सामान्य अध्ययन ३ (पेपर ६) व सामान्य अध्ययन ४ (पेपर ७)
२६ एप्रिल – वैकल्पिक विषय पेपर ८ व पेपर ९
सरकारी सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे १४ मार्चपूर्वी अर्ज भरून तयारीला अंतिम टप्प्यात नेण्याचे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षेच्या मैदानात उतरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी म्हणजे त्यांच्या स्वप्नातील सरकारी सेवेकडे जाणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
MHDU News : Vishal Bhadane

Nashik Goda Ghat attack : नाशिकच्या गोदाघाटावर संतापाचा स्फोट! पत्नी मित्रासोबत दिसताच पतीचा कोयत्याने हल्ला
MPSC Main Exam 2025
Nashik: The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the schedule for the State Services Main Examination 2025. Candidates who have qualified in the preliminary examination must submit their application for the main exam by March 14, 2026, which is the last date.
According to the commission, the MPSC State Services Main Examination 2025 will be conducted in phases between March 29 and April 26, 2026. Examination centers will be set up in major cities including Nashik, Pune, Amravati, Chhatrapati Sambhajinagar, Nagpur, and Navi Mumbai.
The recruitment advertisement was initially released in March last year. Later, corrigendums issued on January 8 and February 20 increased the number of posts. Now, the recruitment process will be conducted for a total of 139 posts.
The examination pattern has also undergone a significant change. Earlier, the exam was conducted in an objective multiple-choice format. However, the exam will now follow a descriptive format, which will require candidates to demonstrate deeper understanding and analytical ability.
Exam Pattern:
Language Paper I and Language Paper II will carry 300 marks each, with a minimum qualifying requirement of 25% marks. Papers 3 to 9 will carry a total of 1,750 marks, which will be considered for the merit list. The interview stage will carry 275 marks.
Candidates can write Papers 3 to 7 either in Marathi or English. However, all papers must be answered in the same language as selected in the application form.
Exam Schedule:
March 29 – Language Paper I & Language Paper II
April 5 – Essay (Paper 3)
April 18 – General Studies I (Paper 4) & General Studies II (Paper 5)
April 19 – General Studies III (Paper 6) & General Studies IV (Paper 7)
April 26 – Optional Subject Papers 8 & 9
For thousands of aspirants aiming for government service, this examination is a crucial milestone. Candidates are advised to complete their application before March 14 and focus on the final phase of preparation.

