देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारूती सुझुकीने सणासुदीच्या आधी आपल्या कारच्या किंमतींमध्ये मोठी कपात जाहीर केली आहे. ग्राहकांना या कपातीचा थेट फायदा मिळणार असून २२ सप्टेंबरपासून नवीन दर लागू होणार आहेत.
मारूतीच्या अधिकृत निवेदनानुसार, अलीकडे झालेल्या जीएसटी सुधारणाचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, किमतीत कपात झाल्या तरी कारच्या फीचर्स आणि तंत्रज्ञानात कोणताही बदल होणार नाही.
👉 किंमतीतील महत्त्वाच्या कपाती:
Maruti S-Presso : सर्वाधिक ₹1,29,600 किमतीत कपात→ आता सर्वात स्वस्त कार
Maruti Swift : ₹84,000 ने कमी → नवीन सुरुवातीची किंमत ₹5.79 लाख
Maruti Baleno : ₹86,100 ने कमी → नवीन किंमत ₹5.99 लाख
Maruti Dzire : ₹87,700 ने कमी → नवीन सुरुवातीची किंमत ₹6.26 लाख
Alto K10, WagonR, Ignis : किमतीत कपात
मार्केटिंग अँड सेल्स विभागाचे सीनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पार्थो बॅनर्जी यांनी सांगितले की, “या किंमत कपातीमुळे ग्राहकांना थेट फायदा होईल. सुविधा व तंत्रज्ञान यामध्ये कोणताही बदल केलेला नाही.”
यामुळे या दसरा-दिवाळीत नवीन कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी मारूतीची ऑफर एक मोठी संधी ठरू शकते.

