Malegaon ATS Opration :
मालेगाव : शहरातील नुमानीनगर परिसरात सोमवारी (दि. १३ ऑक्टोबर) रात्री महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश एटीएसच्या संयुक्त पथकाने एक गुप्त कारवाई केली. मोबाईल व व्हॉट्सॲपच्या माध्यमातून परदेशी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून हाफीज तौसिफ असलम शेख (रा. गल्ली क्र. ६, नुमानीनगर, मालेगाव) या तरुणाला एटीएसने (Malegaon ATS Opration) ताब्यात घेतल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारवाईच्या काही वेळ आधी स्थानिक पवारवाडी पोलिसांना फक्त बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले होते, मात्र एटीएसची ही मोहीम अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. सायंकाळी ८ ते १० पोलिस वाहनांचा ताफा थेट नुमानीनगरात पोहोचला आणि काही वेळातच परिसरात मोठी गर्दी झाली.
एटीएस अधिकाऱ्यांनी प्रथम हाफीज तौसिफच्या घरीच चौकशी केली आणि नंतर त्याला ताब्यात घेऊन मालेगाव पोलिस नियंत्रण कक्षात सखोल चौकशीसाठी आणले. चौकशी दरम्यान त्याचा मोबाईल फोन आणि सोशल मीडिया अकाउंट्सची तपासणी करण्यात आली.
प्राथमिक तपासात हाफीज तौसिफ काही परदेशी संघटनांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तो कोणत्या संघटनांशी जोडलेला होता, देशविरोधी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता का, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
दरम्यान, तौसिफचा मोबाईल हॅक झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे असून, चौकशीत तो निर्दोष सुटेल असा विश्वास त्याचे वडील असलम शेख यांनी व्यक्त केला आहे. पोलिस नियंत्रण कक्षात उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
MHDU News: Vishal Bhadane Malegaon ATS Opration
Girish Mahajan Taunted Dada Bhuse: “Trump आणि भुसे यांचे घनिष्ट संबंध असतील!”
एटीएसकारवाई #Malegaon #ATS #Numaninagar #BreakingNews #CrimeNews #MHDUnews #mhdusocial #mhdunews #ats #crime

