Maharashtra Govt : राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींनो, आता e-KYC न केल्यास थांबणार 1500 रुपयांचा हप्ताबाबत सरकारने नवा शासन निर्णय (GR) जारी केला आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ दिला जातो. मात्र आता पुढील हप्ता मिळवण्यासाठी महिलांनी अनिवार्यपणे e-KYC पूर्ण करणे आवश्यक असेल.
लाडकी बहीण योजनेचा लाभ जुलै 2024 पासून सुरू असून, आतापर्यंत लाभार्थींना 14 हप्ते जमा झाले आहेत. ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकताच मिळाला असून सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिळेल अशी शक्यता आहे. मात्र त्याआधीच सरकारने महिलांसाठी कठोर नियम लागू केले आहेत.
शासनाच्या लक्षात आले की अनेक अपात्र लाभार्थींनी देखील या योजनेचा फायदा घेतला. त्यामुळे सरकारने आता Aadhaar Authentication द्वारे पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
➡️ GR नुसार महत्त्वाचे नियम:
दोन महिन्यांच्या आत e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक.
KYC पूर्ण न केल्यास हप्ता थांबवला जाईल.
दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या आत e-KYC करणे बंधनकारक.
अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in
सरकारच्या या नव्या निर्णयामुळे पात्र महिलांना योजनेचा लाभ वेळेत मिळावा, तसेच अपात्रांना रोखता यावे, यासाठी पारदर्शकता वाढवली जाणार आहे.


[…] 👉 eKYC करण्याची प्रक्रिया : […]
[…] Ladki Bahin Yojana beneficiaries must complete e-KYC or no ₹1500 installment […]
[…] […]