Ladki Bahin ekyc Update Relaxलाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी सरकारकडून मोठा दिलासा — केवायसी साठीच्या अटींमध्ये शिथिलता!

Ladki Bahin ekyc Update Relax

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने केवायसी प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेतला असून काही महत्त्वाच्या अटी शिथिल केल्या आहेत.

पूर्वी सरकारने या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली होती. या निर्णयामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये गोंधळ आणि घबराट निर्माण झाली होती. विशेषत: ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत, अथवा घटस्फोटित आहेत, त्यांना केवायसी करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने मोठा दिलासा दिला आहे. कोल्हापूर जिल्हा महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या लाभार्थ्यांचे वडील किंवा पती हयात नाहीत अथवा घटस्फोट झाला आहे, अशा महिलांना आता इतर नातेवाईकांचे आधार कार्ड जोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. (Ladki Bahin ekyc Update Relax)

महिलांना केवायसी करताना स्थानिक पातळीवर सांभाळ करणाऱ्या नातेवाईकाचे, मुलगा किंवा चुलत / मावस भावंड यांपैकी कोणाचाही आधार जोडण्याचा पर्याय आता उपलब्ध आहे. या निर्णयामुळे हजारो लाडक्या बहिणींना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. (Ladki Bahin ekyc Update Relax)

लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा ₹1500 चा आर्थिक लाभ मिळतो. आतापर्यंत महिलांच्या खात्यात 15 हप्ते जमा झाले आहेत. जुलै 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीतील लाभ वितरित झाला असून, ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

महिला व बालविकास विभागाच्या या निर्णयामुळे अनेक महिलांना केवायसी प्रक्रियेतून सुटका मिळेल आणि योजना अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे.

MHDU News : Vishal Bhadane Ladki Bahin ekyc Update Relax

Ladki Bahin ekyc Update Relax
लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी सरकारकडून मोठा दिलासा — केवायसी साठीच्या अटींमध्ये शिथिलता!

Nashik Municipal Corporation Recruitment 2025: नाशिक महापालिकेत ११४ पदांसाठी भरती सुरू; १.३२ लाख पगाराची संधी!..Great Opportunity

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

4 thoughts on “Ladki Bahin ekyc Update Relax : लाडक्या बहिणींसाठी मोठा दिलासा! E-KYC साठी सरकारकडून अट शिथिल…..”
  1. 33win44, that’s a catchy name! Gives me those good luck vibes. The site design is nice, and the game selection is pretty good too. Give it a go, see if it’s your lucky number! 33win44

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *