Kolhapur Giant Wheel Rescue
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरात शुक्रवारी रात्री झालेल्या उरूसदरम्यान थरारक प्रकार घडला. श्री गहिनीनाथ गैबीपीर उरूसात लावण्यात आलेल्या जायंट व्हील पाळण्यात अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि त्यात बसलेले तब्बल १८ नागरिक जवळपास पाच तास हवेत अडकून राहिले. या घटनेनंतर काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाने व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. अखेर सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर सर्व १८ नागरिकांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Kolhapur Giant Wheel Rescue)
दरम्यान, उरूसस्थळी रात्री मोठ्या संख्येने लोक उपस्थित असल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. कागल पोलिस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर घावटे यांनी दलासह घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाचे अधिकारी मनीष रणभिसे यांनी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने दीडशे फूट उंचीची टर्न टेबल लॅडर क्रेन कागल येथे पाठवून दिली. या क्रेनच्या साहाय्याने अडकलेले सर्व नागरिक सुरक्षितपणे खाली उतरवले गेले.
तांत्रिक बिघाडामुळे पाळणा अचानक थांबला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, पाळणा चालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून संबंधितांनी परवानगी घेतली होती का, याची चौकशी सुरू आहे. नागरिकांना वेळेत मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. (Kolhapur Giant Wheel Rescue)
या पाळण्यात गोकुळशिरगाव, कणेरी मठ, कागल, निपाणी आणि पुणे येथील नागरिकांचा समावेश होता. सर्वांना सुखरूपपणे खाली आणल्याने स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (Kolhapur Giant Wheel Rescue)
MHDU News : Vishal Bhadane
Diwali Safety and Sensitivity Tips
Kolhapur #KolhapurRescue #Kagal #GiantWheel #FairAccident #KolhapurNews #Maharashtra #FireBrigade #MHDU #MHDUnews #MHDUsocial


[…] […]
Pixbet4, a galera tá falando que é rapidinho pra sacar! Isso me animou, viu? Vou testar e ver se a fama é verdadeira! Se liga aqui: pixbet4
QQ88sprachrei is a good option for a reliable site to play at. I’ve found their service to be dependable. Take a look at: qq88sprachrei.