Jemimah Rodrigues cried press conferenceभारताला अंतिम फेरीत पोहोचवणाऱ्या शतकी खेळीनंतर भावनिक झालेली जेमिमा रॉड्रिग्ज

Jemimah Rodrigues cried press conference

आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला. नॉकआऊट सामन्यांमध्ये अनेकदा ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली होती, परंतु या वेळी भारतीय खेळाडूंनी अद्भुत कामगिरी करत इतिहास घडवला.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने तब्बल ३३८ धावांचा डोंगर उभारला होता, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचं वाटत होतं. मात्र, हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज या जोडीने शेवटपर्यंत झुंज देत भारताला अंतिम फेरीचं तिकीट मिळवून दिलं.

या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना जेमिमा रॉड्रिग्ज भावनिक झाली. ती म्हणाली, “स्पर्धेच्या सुरुवातीला मी खूप चिंतेतून (anxiety) जात होते. मी माझ्या आईला फोन करून खूप रडायचे. anxiety चा त्रास झाल्यावर सर्व काही सुन्न झाल्यासारखं वाटतं.” (Jemimah Rodrigues cried press conference)

तिने पुढे सांगितले, “त्या काळात माझ्या आई-वडिलांनी मला खूप आधार दिला. तसेच संघातील अरुंधती रेड्डीसमोर मी नेहमी रडायचे. मी तिला गंमतीने म्हणायचे, ‘तू माझ्यासमोर येऊ नकोस, नाहीतर मी पुन्हा रडेन.’”

संघातील वरिष्ठ खेळाडू स्मृती मानधनानेही जेमिमाला मानसिक आधार दिला. जेमिमा म्हणाली, “स्मृती दररोज माझी विचारपूस करायची. तिला माहीत होतं मी कोणत्या परिस्थितीतून जात आहे. ती फक्त माझ्या जवळ उभी असायची, काही बोलायची नाही. कारण तिची उपस्थितीच माझ्यासाठी पुरेशी होती.” (Jemimah Rodrigues cried press conference)

या विजयामुळे भारतीय महिला संघाने पुन्हा एकदा आपल्या लढाऊ वृत्तीचं आणि मानसिक ताकदीचं दर्शन घडवलं आहे.

MHDU News : Vishal Bhadane Jemimah Rodrigues cried press conference

Jemimah Rodrigues cried press conference
भारताला अंतिम फेरीत पोहोचवणाऱ्या शतकी खेळीनंतर भावनिक झालेली जेमिमा रॉड्रिग्ज

MRF Supercross Nashik 2025 : नाशिकमध्ये रंगणार एम आर एफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार!

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

3 thoughts on “Jemimah Rodrigues cried press conference : India’s win, breaks down in press conference | विजय मिळाल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्जला पत्रकार परिषदेत अश्रू अनावर”
  1. Oi, galera! Achei o barganha8 show de bola pra quem tá procurando umas promoções maneiras. Naveguei por lá rapidinho e já achei uns descontos bem legais. Vale a pena conferir! E olha, clica aqui: barganha8

  2. Hey guys, just signed into Fb7771, and it felt very good. A lot of promos and fair gameplay. It gives a thrilling welcome. Try it and Feel the joy! fb7771

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *