Jalgaon Sufi Night Pistol
जळगावात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिस मुख्यालय परिसरातील पद्मालय सभागृहात आयोजित “दिवाळी सुफी नाईट” कार्यक्रमात, कमरेला पिस्तूल लावून एका तरुणाने नोटांची उधळण केल्याचा प्रकार घडला आहे. (Jalgaon Sufi Night Pistol)
हा प्रकार घडवणारा तरुण म्हणजे पियुष मण्यार (रा. जळगाव). त्याने पांढरा शर्ट घालून, कमरेला पिस्तूल नीट दिसेल अशा पद्धतीने ठेवले आणि कार्यक्रमादरम्यान स्टेजजवळ नाचत गायकावर नोटांची उधळण केली. या घटनेचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे. (Jalgaon Sufi Night Pistol)
घटनेनंतर जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी स्वतः फिर्याद दिली आहे. पिस्तूल परवान्याचे नियम माहित असतानाही, मुद्दाम पिस्तूल उघडपणे दाखवून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हेतू होता, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. (Jalgaon Sufi Night Pistol)
त्यावरून २२ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा, पियुष मण्यार याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३० व महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Sufi Night Pistol)
हा संपूर्ण प्रकार जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयालगत असलेल्या पोलिस मुख्यालयाच्या परिसरातच घडल्याने, पोलिसांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांमध्येही या घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे.
MHDU News : Vishal Bhadane
Diwali Safety and Sensitivity Tips
Jalgaon #SufiNight #ViralVideo #JalgaonPolice #LawAndOrder #BreakingNews #MaharashtraNews #PiyushManiyar #MHDU #MHDUnews #mhdusocial


Rainha dos Slots? Esse nome me chamou a atenção! Já joguei umas rodadas e adorei os gráficos. Tomara que a rainha me abençoe com uns prêmios! Clica aqui: rainha dos slots
Need to get back in the game? jili188 casino login is your hookup! Nice and straightforward to log in. Get those wins, yo!