Indurikar Maharaj Daughter Engagementइंदुरीकर महाराजांच्या कन्येच्या साखरपुड्यात झालेल्या खर्चावरून टीकेची झोड उठली आहे.

Indurikar Maharaj Daughter Engagement

विनोदी शैलीतील किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर हे सर्वपरिचित नाव आहे. महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या किर्तनाला प्रचंड गर्दी असते आणि त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. समाजातील विविध विषयांवर परखड भाष्य करणारे आणि साधेपणाने जगण्याचा संदेश देणारे इंदुरीकर महाराज आता मात्र स्वतःच टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

त्यांच्या कन्या ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा संगमनेर येथे वसंत लॉन्समध्ये थाटामाटात पार पडला, आणि या साखरपुड्यात लाखो रुपयांचा खर्च झाल्याचं समोर आलं आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या चर्चांना आणि टीकेला ऊत आला आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी निवृत्ती महाराज इंदुरीकरांवर जोरदार टीका केली आहे.
ते म्हणाले — (Indurikar Maharaj Daughter Engagement)

“बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, या उक्तीप्रमाणे जर निवृत्ती महाराज वागले असते तर त्यांनी मुलीचा साखरपुडा साध्या पद्धतीने करून समाजापुढे आदर्श निर्माण केला असता. समाजाला कीर्तनातून उपदेश करतात पण आचरणात आणत नाहीत, याचा खेद वारकरी सांप्रदायाला आहे.” (Indurikar Maharaj Daughter Engagement)

तळेकर पुढे म्हणाले की, इंदुरीकर महाराजांनी स्वतःच्या लेकीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च करून “साधेपणाचा” उपदेश विसरल्यासारखे केले आहे. (Indurikar Maharaj Daughter Engagement)

या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेते आणि बड्या मंडळींनी हजेरी लावली होती, त्यामुळे या सोहळ्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.

MHDU News : Vishal Bhadane

mhdunews #mhdusocial #IndurikarMaharaj #SubhashTalekar #Engagement #MaharashtraNews #MarathiNews #IndurikarControversy #ViralNews #MHDU

Pimparkhed Tiger Attack Children Killed : बिबट्याच्या हल्ल्यात 2 बालकांचा मृत्यू; संतप्त गावकऱ्यांनी वनविभागाची गाडी पेटवली

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

3 thoughts on “Indurikar Maharaj Daughter Engagement : इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च?; डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांची टीका”
  1. Guys, you know I love to keep it real so, I’m going to say betanocassino is legit. Their site is easy to navigate and I didn’t have any glitches so, I will say I’m happy with everything. betanocassino is a good shout!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *