India Wins Women World Cup 2025
भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचला आहे! हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने 2025 च्या महिला विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं असून, देशभरात जल्लोषाचा माहोल निर्माण झाला आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला तब्बल 52 धावांनी पराभूत करत पहिल्यांदाच ICC World Cup ट्रॉफी जिंकली.
पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने 7 बाद 298 धावा केल्या. शेफाली वर्मा (87) आणि दीप्ती शर्मा (58) यांनी शानदार खेळ केला. गोलंदाजीतही दीप्तीने पाच बळी घेतले आणि दक्षिण आफ्रिकेला 45.3 षटकांत 246 धावांवर गारद केलं.
या ऐतिहासिक विजयावर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे, इरफान पठान, हरभजन सिंह, आर. अश्विन आणि रोहित शर्मा यांनी संघाचे अभिनंदन केले.
सचिन तेंडुलकर म्हणाले:
“1983 च्या विजयाने जसं अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली, तसंच आपल्या महिला क्रिकेट संघाने आज असंख्य मुलींना प्रेरित केलं आहे. त्यांनी देशभरातील मुलींना विश्वास दिला की त्या काहीही करू शकतात.”
अनिल कुंबळे:
“हा विजय संघाच्या शिस्तबद्ध आणि निडर वृत्तीचं प्रतीक आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत अप्रतिम खेळ.”
वीरेंद्र सेहवाग: India Wins Women World Cup 2025
“चॅम्पियन्स! प्रत्येक चौकार, विकेट आणि त्यांच्या जिद्दीने देशाचं हृदय जिंकलं.”
इरफान पठान: India Wins Women World Cup 2025
“दीप्ती आणि शेफालीचा खेळ अविस्मरणीय! संपूर्ण संघाला मनःपूर्वक शुभेच्छा.”
हरभजन सिंह आणि आर. अश्विन: India Wins Women World Cup 2025
“आपण चॅम्पियन्स आहोत! भारत महान होता आणि सदैव राहील. जय हिंद.”
विराट कोहली: India Wins Women World Cup 2025
“तुम्ही पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान झाला आहात. तुमच्या निर्भय खेळाने प्रत्येक भारतीयाचा अभिमान वाढवला आहे.”
रोहित शर्मा भावूक:
सामना पाहण्यासाठी रोहित शर्मा स्वतः मैदानात उपस्थित होता. संघाच्या विजयाने तो भावूक झाला आणि म्हणाला — “ही फक्त ट्रॉफी नाही, हा भारतीय महिला क्रिकेटचा नवा अध्याय आहे.”
या विजयासह भारताने महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरलं आहे. देशभरातून “म्हारी छोरियां छोरो से कम है के!” असा नारा पुन्हा एकदा घुमला आहे!
MHDU News : Vishal Bhadane


Typhu88vips, alright! Let’s see if I can finally hit that jackpot. Been playing a while, due for a good win I reckon! Ready to roll! typhu88vips
[…] […]
Alright, looking into Linkred88. Easy access? Yes! Good options? Double Yes! Go have some fun: linkred88