सोलापूर: लावणी करणाऱ्याच्या जाळ्यात फसून उपसरपंचाची गोड्या झाडून आत्महत्या
प्रेम आंधळं असतं असं म्हटलं जातं; पण कधी कधी त्याचं रूप भयंकर ठरू शकतं. बीड जिल्ह्यातील घेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सासूर गावात लावणी करणाऱ्या महिलेच्या जाळ्यात अडकून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
👉 पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी Play करा
सोलापूर जिल्ह्यातील सासूर गावात शनिवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. बीड जिल्ह्यातील घेवराई तालुक्यातील लुखामसला गावचा उपसरपंच गोविंद बर्गे (वय 40) यांनी गाडी लावून, गाडी लॉक करून स्वतःवर गोळी झाडून आपलं जीवन संपवलं.
या प्रकरणात पूजा गायकवाड नावाची लावणी करणारी महिला असल्याचं समोर आलं आहे. 2024 मध्ये गोविंद बर्गे आणि पूजाची ओळख झाली आणि नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पण या नात्याचा फायदा घेत पूजाने उपसरपंचावर पैशासाठी, सोन्यासाठी आणि जमिनीसाठी दबाव टाकला. इतकंच नव्हे तर त्याच्या बंगल्याचं नाव स्वतःच्या नावावर करण्याचा आणि शेतजमीन आपल्या भावाच्या नावावर करण्याचा आग्रहही तिने धरला.
हे सर्व न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी तिने दिल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून गोविंद बर्गे यांनी अखेर हा टोकाचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांनी आत्महत्या पूजा गायकवाडच्या घरासमोरच केली.
गोविंद बर्गे विवाहित होते. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

