नाशिक जिल्ह्यातील ओझर (अंबे हिल) येथील Advanced Centre for Energetic Materials (ACEM), DRDO मध्ये दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी स्थिर रॉकेट मोटरची यशस्वी चाचणी पार पडली. या चाचणीदरम्यान परिसरात तब्बल 70 सेकंदांसाठी 180 dB पर्यंत आवाज झाला, ज्यामुळे अनेक नागरिकांना मोठा स्फोट झाल्यासारखा अनुभव आला.
DRDO ची अधिकृत सूचना
या चाचणीबाबत ACEM, DRDO कडून आधीच अधिकृत पत्र ग्रामपंचायतींना पाठवण्यात आले होते. त्या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले होते की —
चाचणी नियोजित स्वरूपात दुपारी होणार आहे.
आवाज 180 dB पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही.
चाचणीदरम्यान परिसरात अनधिकृत प्रवेशास सक्त मनाई असेल.
सविस्तर व्हिडिओ पाहा:
👉 संबंधित पोस्ट वाचा: Maharashtra Defence Updates
नाशिककरांची प्रतिक्रिया
चाचणीदरम्यान झालेल्या मोठ्या आवाजामुळे अनेक नागरिकांनी घबराट व्यक्त केली. सोशल मीडियावर या चाचणीचे व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाले. मात्र, प्रशासनाने दिलेली पूर्वसूचना तितकी वायरल झाली नसल्याने अनेकांना गोंधळ निर्माण झाला.
महत्वाचे मुद्दे
ठिकाण: ACEM-DRDO, अंबे हिल, ओझर, नाशिक.
दिनांक: 12 सप्टेंबर 2025.
चाचणी प्रकार: स्थिर रॉकेट मोटर टेस्ट.
कालावधी: सुमारे 70 सेकंद.
ध्वनी स्तर: अंदाजे 180 dB.
नाशिककरांनो, या चाचणीदरम्यान ऐकू आलेला मोठा आवाज ही एक नियमित व अधिकृत DRDO चाचणी होती. यामुळे कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही.
भारताच्या सुरक्षेसाठी व संरक्षण क्षेत्रातील संशोधनासाठी ही चाचणी महत्त्वपूर्ण असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

