Gopal Badne Surrendered
सातारा | फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने (Gopal Badne) अखेर फलटण शहर पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बदने पोलिसांना चकवून फरार होता.
फलटण शहर व ग्रामीण पोलिसांकडून त्याचा सर्वत्र शोध सुरू होता. सातारा पोलिसांनीही पंढरपूर आणि पुणे परिसरात पथकं रवाना केली होती. मात्र, आज सकाळी गोपाळ बदने स्वतः फलटण पोलीस ठाण्यात येऊन समर्पण केल्याची माहिती मिळाली आहे. (Gopal Badne Surrendered)
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीने आपल्या हातावर लिहिलेल्या चिठ्ठीत PSI गोपाळ बदने याने तिच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला होता. या खुलाशानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. घटनेनंतर गोपाळ बदने याला निलंबित करण्यात आले होते. (Gopal Badne Surrendered)
दरम्यान, या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकर यालाही पोलिसांनी अटक केली आहे. आत्महत्येच्या चिठ्ठीत त्याचंही नाव नमूद करण्यात आलं होतं. बनकर याच्यावर चार महिन्यांपासून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पुण्यातून त्याला अटक करून फलटण न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.(Gopal Badne Surrendered)
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांनी मृत डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांना भेट देऊन आश्वासन दिलं आहे की, डॉक्टर तरुणीला न्याय मिळाल्याशिवाय त्या स्वस्थ बसणार नाहीत.
सध्या निलंबित PSI गोपाळ बदने फलटण पोलिस ठाण्यात हजर झाला असून पुढील कायदेशीर कारवाईबाबत सर्वांचे लक्ष पोलिसांच्या हालचालीकडे लागले आहे.
MHDU News : Vishal Bhadane
Sangli Police Baby Rescue : सांगली पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी: 1 वर्षाच्या बाळाची सुखरूप सुटका

GopalBadne #FaltanDoctorSuicide #FaltanPolice #SataraNews #MaharashtraPolice #MHDU #MHDUnews #mhdusocial #mhdunews


[…] Badne Surrendered : निलंबित PSI गोपाळ बदने फलटण पोलिस ठाण्यात […]
Looking for something a bit tamer? pg13game is surprisingly fun. It has a good mix of casual and slightly more challenging games to keep you entertained. Perfect for killing some time. Give pg13 a go!
Word on the street is abc8a8 is the real deal. I gotta say, I’m impressed The site is easy to understand and the variety keeps me busy abc8a8