Gautami Patil Car Accident Gets Clean Chit
Pune News : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कारच्या अपघात प्रकरणावरून राज्यात मोठी चर्चा रंगली होती. मात्र आता या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे झोन ३ चे DCP संभाजी कदम यांनी स्वतः हा संपूर्ण तपास हाताळत अधिकृतपणे जाहीर केले आहे की, गौतमी पाटील यांचा या अपघाताशी कोणताही संबंध नाही.
डीसीपी कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सर्व ऑडिओ, व्हिडिओ, तांत्रिक तपास, जखमीला मदत करणारे साक्षीदार तसेच इतर सर्व पुरावे तपासल्यानंतर निष्पन्न झाले आहे की गौतमी पाटील या घटनेत कुठेही सहभागी नव्हत्या.
फक्त एवढेच स्पष्ट झाले आहे की अपघातात सामील झालेली कार गौतमी पाटील यांच्या नावावर होती. तसेच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका पेट्रोल पंपावर त्यांच्या गाडीतून गौतमी पाटील उतरतानाचे दृश्य दिसत आहे, परंतु ती घटना अपघात होण्याआधीची आहे.
तपासात पुढे असेही समोर आले आहे की अपघात घडला तेव्हा गाडीत केवळ एकच व्यक्ती – ड्रायव्हर – होता. भोर आणि सातारा दरम्यान अपघात होईपर्यंतचे सर्व CCTV फुटेज तपासल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
या सर्व तपासानंतर पुणे पोलिसांनी स्पष्ट केले की, गौतमी पाटील यांना या अपघात प्रकरणात आता संपूर्ण क्लीन चिट देण्यात आली आहे.
Gautami Patil Car Accident Gets Clean Chit
वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुण डॉक्टर अविष्कार गायकवाडचा दुर्दैवी मृत्यू



[…] […]