Flood Relief Fund Maharashtra
राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले. जमिनी वाहून गेल्या, घरे कोसळली, जनावरे दगावली आणि अनेक नागरिक आजही पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. या परिस्थितीला पाहता राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी Flood Relief Fund मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रत्यक्ष दौरे करून परिस्थितीचे गांभीर्य ओळखले असून, दिवाळीपूर्वीच मदत पोहोचविण्याची तयारी केली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे — सरकार कोणतेही निकष लावणार नाही.
📍 बीड, लातूर, परभणी, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांवर अतिवृष्टीचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. संपूर्ण मंत्रिमंडळाने या भागांचा दौरा करून नुकसानाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले.
🏛️ जिल्हाधिकाऱ्यांना थेट अधिकार
आस्मानी संकटानंतर सामान्यतः मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच मदत वितरित केली जाते. मात्र यावेळी सरकारने थेट जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत. आता ते वार्षिक जिल्हा योजनेंतर्गत निधीचा वापर अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ यांसारख्या आपत्तींसाठी करू शकतील.
जिल्हाधिकारी एकूण वार्षिक निधीच्या 5% पर्यंत रक्कम तातडीच्या उपाययोजनांसाठी वापरू शकतात.
परिस्थिती गंभीर असल्यास 10% पर्यंत निधी खर्च करण्याची मुभा मिळेल.
यासाठी जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री निधी मंजूर करू शकतील.
📜 शासन निर्णय जारी
राज्य सरकारने 29 सप्टेंबर रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार —
ज्या भागात 65 मिमी किंवा अधिक पाऊस झाला आहे, तिथे तात्काळ उपाययोजना राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यामध्ये वैद्यकीय सुविधा, रस्ते व पूल दुरुस्ती, वीजपुरवठा सुरळीत करणे, सार्वजनिक इमारतींची दुरुस्ती अशा 22 तातडीच्या कामांचा समावेश आहे.
राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीपूर्वीच ही मदत लोकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकरी आणि नागरिकांना कोणतेही अर्ज किंवा कागदपत्रांची क्लिष्ट प्रक्रिया पार करावी लागणार नाही. Flood Relief Fund Maharashtra या योजनेतून बाधितांना थेट जिल्हास्तरावरून मदत दिली जाणार आहे.
नवीन ताज्या घडामोडी 👇: Flood Relief Fund: अतिवृष्टीग्रस्तांना दिवाळीपूर्वीच सरकारकडून मदत; जिल्हाधिकाऱ्यांना थेट अधिकार, 29 सप्टेंबर रोजी शासन निर्णय जारीLawrence Bishnoi gang in Canada


[…] […]
[…] […]
[…] flood-relief-fund-maharashtra […]