Dhule News : Education Officer’s Chair Seized by Court
धुळ्यात एका शिक्षण अधिकाऱ्याच्या खुर्चीवरच न्यायालयाने (Education Officer’s Chair Seized) जप्तीची कारवाई केल्याने संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. कोर्टाच्या या आदेशाने सरकारी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर मोठा सवाल उपस्थित केला आहे.
ही घटना गुरुदत्त विद्या प्रसारक संस्थेच्या आदर्श माध्यमिक विद्यालयाशी संबंधित आहे. या शाळेत विश्वास पाटील हे मुख्याध्यापक म्हणून जवळपास 10 वर्षे कार्यरत होते. मात्र, संस्थेच्या संचालक मंडळाने त्यांना बेकायदेशीरपणे निलंबित केले आणि त्यांचा थकीत पगारही दिला नाही.
Dhule News
विश्वास पाटील यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. नाशिक शाळा प्राधिकरण न्यायालय आणि त्यानंतर धुळे न्यायालयानेही त्यांच्याच बाजूने निकाल देत संस्थेकडून 1 कोटी 36 लाख रुपयांचा थकीत पगार वसूल करून देण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले.
पण शिक्षण विभागाने आदेशाची अंमलबजावणीच केली नाही. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला. अखेर न्यायालयाने शिक्षण अधिकाऱ्यांच्या खुर्चीवरच जप्तीचे आदेश दिले.
विश्वास पाटील यांनी वकिलांसह शिक्षण विभागाचे कार्यालय गाठून खुर्ची जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्या वेळी मुख्य शिक्षणाधिकारी बाहेरगावी असल्यामुळे उपशिक्षणाधिकारी ठाकूर मॅडम यांची खुर्ची कायदेशीर प्रक्रियेनुसार जप्त करण्यात आली.
या घटनेने संपूर्ण शिक्षण विभागात खळबळ उडाली असून कोर्टाचा आदेश किती प्रभावी असू शकतो हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. संबंधित संस्थेवर आणि अधिकाऱ्यांवर पुढील कायदेशीर कारवाई होणार असल्याचे ॲड. निलेश चौधरी यांनी सांगितले.
Dhule News


