CM Devendra Fadnavis on Bachchu Kadu farmers protestमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडूंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देत सरकारची सकारात्मक भूमिका स्पष्ट केली.

Devendra Fadnavis Bachchu Kadu Farmers Protest

नागपूर : शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शेतकरी आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सरकारने पहिल्याच दिवसापासून या आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले आहे. (Devendra Fadnavis Bachchu Kadu Farmers Protest)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आंदोलनाच्या आधीच सरकारने चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती आणि बच्चू कडू यांनी त्यास सुरुवातीला होकारही दिला होता. मात्र, आदल्या रात्री कडू यांनी नकाराचा संदेश पाठवला, अशी माहिती त्यांनी दिली. (Devendra Fadnavis Bachchu Kadu Farmers Protest)

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, बच्चू कडूंनी मांडलेले प्रश्न हे फक्त आंदोलनात बोलून सुटणारे नाहीत, त्यावर सविस्तर चर्चा करून ‘रोड मॅप’ तयार करणे आवश्यक आहे, म्हणूनच सरकारने चर्चेचं निमंत्रण दिले आहे.

फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात सांगितले की, पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे पैसे देण्यास सुरुवात झाली आहे, आणि ज्यांची शेती पूर्णपणे पाण्यात गेली आहे, त्यांना प्राधान्याने आर्थिक सहाय्य दिले जाईल.

या वक्तव्यामुळे राज्यातील शेतकरी आंदोलनावर नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे.

MHDU News : Vishal Bhadane Devendra Fadnavis Bachchu Kadu Farmers Protest

Devendra Fadnavis Guru Tegh Bahadur 350 Mumbai

महाराष्ट्र #शेतकरीआंदोलन #BachchuKadu #DevendraFadnavis #Nagpur #FarmersProtest #MHDUnews #mhdusocial

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

4 thoughts on “Devendra Fadnavis Bachchu Kadu Farmers Protest : बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया; सरकारची सकारात्मक भूमिका स्पष्ट………0”
  1. Winphcasino is pretty decent, lots of games, and I actually managed to cash out a few times without any hassle. Check them out if you’re looking for a relatively reliable casino at winphcasino. Remember to play responsibly!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *